‘अंग्रेजी मीडियम’ पोस्टर रिलीजनंतर, इरफानचा चाहत्यांना भावूक संदेश

अभिनेता इरफान खान हा मागील वर्षभरापासून 'न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर' या कर्करोगावर लढा देताना दिसतो आहे. या पोस्टरसोबत इरफानने एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसाठी संदेश दिला आहे.

Mumbai
irrfan khan share a video after releaseing a poster of angresi midiam
'अंग्रेजी मीडियम' सिनेमाच्या पोस्टर रिलीजनंतर, इरफानचा चाहत्यांना भावुक संदेश

बॉलिवूड अभिनेता इरफान खान हा लवकरच एका नव्या सिनेमातून, प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. अभिनेता इरफान खान हा मागील वर्षभरापासून ‘न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर’ या कर्करोगावर लढा देत आहे. या पोस्टरसोबत इरफानने एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसाठी संदेश दिला आहे.

 

इरफानने हा व्हिडीओ स्वत:च्या आवाजात रेकॉड केला असून, यात सिनेमाच्या शुटींगदरम्यानची काही क्षणचित्रे देखील पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेता इरफान खान हा मागील वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देत आहे. ‘परिस्थिती कितीही वाईट असली तरिही आपण कायम खंबीर राहीले पाहिजे, आपण सकारात्मक राहण्याशिवाय पर्याय नाही’, असा संदेश त्याने दिला आहे.

काय म्हणाला इरफान?

‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाच्या पोस्टर सोबत त्याने चाहत्यांसाठी एक भावनिक संदेश दिला आहे की, ‘मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. मेरे दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यारसे हम लोगोंने इसे बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वार्तालाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. जैसा भी होगा, आपको इतेलाह कर दिया जाएगा.’ असं त्याने त्याच्या चाहत्यांना दिलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे. या सोबतच, ‘जेंव्हा आयुष्य तुम्हाला तुमच्या हाती आंबट चव असलेला लिंबू देते, तेंव्हा त्याचा गोड लिंबू सरबत बनवावा; हा सिनेमा तुम्हाला नक्कीच हसवेल, रडवेल आणि पुन्हा हसवेल असे देखील यावेळेस तो म्हणाला आहे.

कसा असेल सिनेमा?

गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान खानचा अंग्रेजी मिडीयम हा सिनेमा चर्चेत आहे. येत्या २० मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला असून, गुरूवार ( १३ फेब्रुवारी ) रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री राधिका मदान ही इरफानच्या मुलीची भूमिका साकारत असून, करीना कपूर खानने या चित्रपटात इरफानच्या पत्नीची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे.