घरमनोरंजनइरफान खान दोन दिवसांसाठी भारतात परतला; शिव मंदिरात केले हवन

इरफान खान दोन दिवसांसाठी भारतात परतला; शिव मंदिरात केले हवन

Subscribe

लंडनमध्ये एका गंभीर आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान अवघ्या दोन दिवसांकरता भारतात परतला होता. इरफानचा हा भारत दौरा खुपच गुप्त ठेवण्यात आला होता.

लंडनमध्ये एका गंभीर आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान अवघ्या दोन दिवसांकरता भारतात परतला होता. इरफानचा हा भारत दौरा खुपच गुप्त ठेवण्यात आला होता. इरफान खानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा आजार जडला असून त्यावर उपचार घेण्यासाठी बॉलीवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये राहत आहेत. दरम्यान, इरफान याने भारत दौरा केला असून त्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील शिव मंदिराला भेट दिली असून येथे हवन आणि पूजा केल्याचे समजते. ही माहिती स्पॉटबॉट या वेबसाइटने दिली असून इरफान एक वैयक्तीक कामासाठी भारतात परतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

वाचा : Good News!!इरफान खान लवकरच मायदेशी परतणार

मार्च २०१९ ला भारतात येण्याची शक्यता 

इरफान खान किती दिवसांसाठी भारतात आला होता, हे सांगणे कठिण आहे. ही केवळ दिवसांची ट्रिप होती, असे म्हटले जात आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा इरफान लंडनला निघून गेला आहे. इरफान हा पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत भारतात येईल, अशी माहिती यापूर्वी सांगितली जात होती.

- Advertisement -

वाचा : मी जास्त दिवस जगणार नाही – इरफान खान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -