घरमनोरंजनइरफानचा लेटेस्ट फोटो व्हायरल! उपचारानंतर घटले वजन

इरफानचा लेटेस्ट फोटो व्हायरल! उपचारानंतर घटले वजन

Subscribe

कॅन्सरच्या उपचारासाठी लंडनमध्ये गेलेल्या इरफान खानचे चाहते, तो सध्या कसा असेल? त्याची तब्ब्येत कशी असेल हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. अशातच इरफानचा समोर आलेला हा हसरा फोटो त्याच्या चाहत्यांसाठी सुखद धक्काच म्हणावा लागेल.

बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार आणि रिअल अभिनयाची छाप पाडणार इरफान खान, सध्या लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतो आहे. मध्यंतरी इरफानने सोशल मीडियावर एक पत्र लिहीत चाहत्यांना भावूक केलं होतं. नुकताच इरफानने त्याचा ताजा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इरफान खानने त्याच्या ट्वीटर अकाउंटवर हा फोटो डिस्प्ले पिक्चर म्हणून ठेवला आहे. या फोटोमध्ये इरफानचे वजन खूपच घटल्याचे जाणवते आहे. मात्र. दुसरीकडे पिवळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेल्या इरफानच्या चेहऱ्यावर निखळ हास्य पाहायला मिळत आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी इंग्लंडमध्ये गेलेल्या इरफानला पाहण्यासाठी त्याचे चाहते आसुसले होते. इरफान कसा असले, त्याची तब्ब्येत कशी असेल हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक होते. अशातच इरफानचा असा हसरा फोटो समोर येणं त्यांच्यासाठी सुखद धक्काच म्हणावा लागेल. इरफानचा हा ताजा फोटो सोशल मीडियावर सध्या झपाट्याने व्हायरल होत असून, नेटिझन्सची आणि चाहत्यांची या फोटोला पसंती मिळत आहे.

irrfan khan twitter trending
इरफान खानचा समोर आलेला ताजा फोटो (सौजन्य-ट्वीटर)

चाहत्यांना केले भावूक

इरफान सध्या न्यूरोअॅन्डोक्राईन कॅन्सरवर लंडनमध्ये उपचार घेत आहे. आयुष्यात अचानक आलेल्या या वळणामुळे माझं सपूर्ण आयुष्यच बदलून गेल्याचं, इरफानने मध्यंतरी म्हटलं होतं. सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पत्रात याविषयीचं आपलं मत मांडत, इरफानने चाहत्यांना भावूक केलं होतं. वाचा नेमकं काय म्हणाला होता इरफान…

- Advertisement -

”हा आजार दुर्मिळ आहे किंवा याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. याचे उपचार खूप कमी आहेत हे सगळं आता माझ्या सहज लक्षात आलं आहे. आता माझ्या आयुष्याचा हा अविभाज्य भाग झालाय जणू. खरं सांगू का? मी अगदी मजेत होतो. अगदी फास्ट ट्रेनप्रमाणे माझा आयुष्याचा प्रवास चालू होता. माझी स्वप्नं, माझं ध्येय, माझी कामं या सगळ्यात प्रचंड व्यस्त होतो. मागे वळून पाहायला पण वेळ नव्हता. पण अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारली. सहज पाहिलं तर हा तर आयुष्य थांबवणारा टीसी, मला म्हणाला, ‘तुमचा मुक्काम इथपर्यंतच, चला आता.’ मी अचानक गोंधळलो, मी म्हटलं त्याला ‘नाही, नाही. इथं नाही मला उतरायचं’. मित्रांनो हेच आयुष्य आहे. अचानक कधी कुठे काय तुमच्यासाठी घेऊन येईल सांगता येत नाही. जीवन- मृत्यूच्या या खेळात फक्त उमेदीचाच एक रस्ता होता. सगळी शक्ती एकवटून मी माझा खेळ योग्यपणे खेळू शकतो हे अचानक मला जाणवलं आणि आता मी सगळ्या गोष्टींसाठी सज्ज झालो आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -