घरमनोरंजननाना पाटेकरांची टीम 'क्लीन चीट'ची अफवा पसरवत आहे - तनुश्री दत्ता

नाना पाटेकरांची टीम ‘क्लीन चीट’ची अफवा पसरवत आहे – तनुश्री दत्ता

Subscribe

अभिनेते नाना पाटेकर यांना 'मी-टू' प्रकरणात क्लीन चीट मिळाल्याची माहिती दोन दिवासांपासून सोशल मीडियावर फिरत होती. मात्र ही माहिती खोटी असल्याचा उलगडा ओशिवरा पोलीसांनी आणि तनुश्री दत्ता यांनी केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी-टू’ प्रकरणी क्लीन चीट मिळाल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत होती. परंतु, नाना पाटेकर यांना याप्रकरणी अध्यापही क्लीन चीट मिळालेली नाही, असा खुलासा बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. यासंदर्भात ओशिवरा पोलिसांनी देखील नाना पाटेकर यांना क्लीन चीट न मिळाल्याची माहिती दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी ‘मी-टू’ मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा गदारोळ झाला होता. या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली होती. त्यानंतर ती परदेशात वास्तव्यास गेली होती. गेल्यावर्षी ती परदेशातून भारतात आली. त्यानंतर तीने ‘मी-टू’ मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाची दखल घेऊन चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -

तनुश्रीने जारी केले स्टेटमेण्ट

दोन दिवसांपासून याप्रकरणी नाना पाटेकर यांना क्लीन चीट मिळाल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर सुरु होती. यावर तनुश्री दत्ताने एक स्टेटमेण्ट जारी केले आहे. या स्टेटमेण्टमध्ये तिने म्हटले आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिल्याची बातमी फिरत आहे. परंतु, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मीटू चळवळीनंतर नाना पाटेकर यांना कोणतेही काम मिळत नसल्याने त्यांची टीम अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहे. या शिवाय नाना पाटेकर यांचे लोक प्रत्यक्षदर्शींना त्यांचे स्टेटमेण्ट देण्यापासून धमकावत आहेत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -