जॅकलीन फर्नांडिस बनणार मिसेस सिरियल किलर

नेटफ्लिक्स इंडियाने या वेबसिरीजमधील जॅकलीनचा फर्स्ट लूक नुकताच शेअर केला

mumbai

फराह खानने ‘मिसेज सीरियल किलर’या नावाची वेब सिरीज निर्मिती करण्याची घोषणा केली होती. नेटफ्लिक्सवर ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. ही एक थ्रिलर वेबसिरीज असेल. या वेबसिरीजचे दिग्दर्शन त्यांचे पती शिरीष कुंदर करणार असून ही येणारी वेबसिरीज डिजिटल चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही नक्कीच चांगली कथा असेल. या वेबसिरीजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर ३३ वर्षीय जॅकलीन फर्नांडिस पदार्पण करणार आहे.

 

View this post on Instagram

 

Mrs. Serial Killer 🖤🖤. @netflix_in @farahkhankunder @shirishkunder @srishtibehlarya @netflix 🖤🖤🖤

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

नेटफ्लिक्स इंडियाने या वेबसिरीजमधील जॅकलीनचा फर्स्ट लूक नुकताच शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो बघायला मिळत आहे. या शेअर करण्यात आलेल्या फोटोत तिने डोक्यावर स्कार्फ बांधला असून जॅकलीनचा वेगळाच अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळेल.

नेटफ्लिक्स इंडियाने या वेबसिरिजची आधिकृत घोषणा करत यामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने नेटफ्लिक्सच्या पोस्टला शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

जॅकलीनने सांगितले की, यामध्ये काम करण्यासाठी बऱ्याच काळापासून वाट पाहत होती. अखेर नेटफ्लिक्स इंडिया ओरिजनल फिल्म मिसेज सीरियल किलर लवकरच येणार असल्याचे घोषणा केली आहे. या वेबसिरिजमध्ये जॅकलीनसोबत मनोज बाजपेयी देखील दिसण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

Rainbow in the background in black and white.#beautifulladdakh #thefamilyman #amazonprime

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj) on