अभिनेत्री सुरभी हांडेचा साखरपुडा!!!

Mumbai
Surbhi hande
अभिनेत्री सुरभी हांडे

‘जय मल्हार’ या मालिकेत म्हाळसाच्या भूमिकेत असणारी सुरभी हांडे हिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सुरभीच्या दमदार अभिनयाने तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. सुरभी आपला मित्र दुर्गेश कुलकर्णीबरोबर जळगावला साखरपुडा केला.

सुरभीने तिच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या सुरभीची ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ ही मालिका प्रचंड गाजतेय. या आधी सुरभी केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगंबाई अरेच्च्या २’ या सिनेमात दिसली होती. मात्र सुरभी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती तिच्या जय मल्हार या मालिकेतील म्हाळसाच्या भूमिकेमुळे!

जळगावला अगदी मोजक्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी अगदी साध्या वेशात सुद्धा सुरभी खूप सुंदर दिसत होती. उपस्थित मित्रमंडळींनी या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.