Video: …आणि जान्हवी म्हणाली प्लीज फोटो काढून नका

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर नेहमी रस्त्यात भेटणाऱ्या गरीब मुलांना मदत करताना दिसते. मात्र तिने आता गरीब मुलांना मदत करतानाचे व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास नकार दिला आहे.

Mumbai
Janhvi Kapoor asks paparazzi to not film her giving food to street kids, says ‘ajeeb lagta hai’. Watch video
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर

गरीब मुलांना मदत करतानाचे जान्हवी कपूरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नेहमी छायाचित्रकारांची जान्हवीचे फोटो काढण्यासाठी कधी तिच्या घराबाहेर तर कधी जिमबाहेर गर्दी पाहायला मिळते. सध्या तिचा गरीब मुलीला मदत करताचा व्हिडिओ एका वेगळ्या कारणासाठी व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी जरी त्या गरीब मुलीला मदत करत असली तरी ती छायाचित्रकारांना फोटो न काढण्याची विनंती करताना दिसत आहे.

जान्हवी छायाचित्रकारांना म्हणाली की, ‘एक संकेदासाठी कॅमेरा बंद करा. प्रत्येक वेळी फोटो काढताना पाहून फार विचित्र वाटते.’ जान्हवी असं सतत सांगताना व्हिडिओ दिसत आहे. मग जान्हवीने आपल्या गाडीजवळ त्या मुलीला घेऊन तिला बिस्किट दिले. त्यावेळी देखील छायाचित्रकारांना तिने फोटो न काढण्याची विनंती केली. मात्र त्यावेळी छायाचित्रकारांनी फक्त फ्लॅश बंद केली, पण कॅमेरा चालू ठेवला.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पाहून खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी कॅमेरासाठी ही मदत करत असल्याचे म्हटलं आहे. तर काहींनी खूप चांगली असल्याचे म्हटलं आहे. तिच्या या दानशूर स्वभावचं अनेक जणांनी कौतुक देखील केलं आहे.

या अगोदर तिचा ऑक्टोबर महिन्यातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये जान्हवीनं ड्रायव्हरकरडून पैसे उधार घेत त्या गरीब मुलीला मदत केली होती.

सध्या जान्हवी कपूर गुंजन सक्सेनावर आधारित असलेल्या चित्रपटात काम करत आहे. तसंच त्यानंतर ती ‘दोस्तान २’ या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. ईशान मीरा नायरच्या ‘ए सुवेबल बॉय’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘काली पीली’ असं आहे.


हेही वाचा – सोशल मीडियावर रंगली नेहा महाजनीच्या ‘त्या’ फोटोंची चर्चा!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here