बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर ‘धडक’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. जान्हवी कपूर तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असताना दिसते. चित्रपटसृष्टीत कमी वेळातच आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये जान्हवी बेली डान्स करताना दिसत आहे.
या व्हायरल होणाऱ्या जान्हवीच्या व्हिडिओमध्ये जान्हवीने बेली डान्स बॉलिवूड गाण्यावर नाही तर रिअलिटी शो डान्स दिवानेच्या टायटल सॉंगवर केला आहे. धडक चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेताने जान्हवीला बेली डान्स करण्याचं चॅलेंज दिले होते.
जान्हवी कपूरने रविवारी हा डान्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या पोस्टमध्ये जान्हवीने #डान्स दिवाने करिता बॅली डान्स वॉर्मअप. जाह्नवीला ’धड़क’च्या दिग्दर्शक शशांक खेतान यांनी या चॅलेंजकरिता नॉमिनेट केले होते,ते ‘डान्स दिवाने २’ चे जज आहे.
जान्हवी कपूर लवकरच ‘रूही अफ्जा’ या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यासाठी जान्हवी कपूर मेहनत घेत असताना तिचा हा बॅली डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चांगलाच व्हायरल होत आहे.