Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केले अलिशान घर, किंमत ऐकून बसेल धक्का

जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केले अलिशान घर, किंमत ऐकून बसेल धक्का

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी जान्हवीने केली करियरला सुरुवात

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड सेलिब्रिटींचे मुंबईतील घरे आणि त्याच्या किंमती नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. पण बॉलिवूडमध्ये अगदी कमी वयात यशस्वी होत मुंबईत कोटींचे घर खरेदी करणाऱ्या आलिया भटनंतर या यादीत भर पडली ती अभिनेत्री जान्हवी कपूरची. जान्हवीने नुकतेच मुंबईच्या जूहु परिसरातील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर हे अलिशान घर खरेदी केले आहे. या घराची किंमत तब्बल ३९ कोटी इतकी आहे. जान्हवीने गेल्यावर्षी ७ डिसेंबरला या घरासंबंधीत करार केला. विशेष म्हणजे या घरासाठी जान्हवीने लाख रुपयांचं मुद्रांक शुल्कही भरलं आहे. सध्या जान्हवी अंधेरी लोखंडवाला येथे बहिण खुशी आणि वडील बोनी कपूर यांच्यासह राहते.

वयाच्या २३ व्या वर्षी जान्हवीने २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. नुकतेच ती ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’ या चित्रपटात झळकली. परंतु हा चित्रपट लॉकडाऊनमुळे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान यावर्षी तिचे राजकुमार राव सोबतचा ‘रुही अफझाना’ आणि कार्तिक आर्यनसोबतचा ‘दोस्ताना २’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय जान्हवी कपूर करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म ‘तख्त’ सिनेमातही दिसणार आहे. सध्या जान्हवी आणि कार्तिक आर्यन गोव्यात वेकेशन एज्यॉय करत आहेत. या दोघांचे गोव्यातील अनेक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा – उर्मिलानंतर आता आशा भोसले यांचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक
- Advertisement -