Video: जान्हवी कपूरचा कथ्थक डान्स सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai
सौजन्य - एनडीटीव्ही

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लॉकडाऊनमध्ये तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या रॉय यांच्या गाण्यावरी कथ्थक या क्लासिकल डान्सचे जान्हवी हिचे व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहेत. नुकतेच जान्हवी तिचे काही फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती वडिल बोनी कपूर आणि बहिण खुशीसोबत दिसत आहे. तसेच माधुरीच्या आजा नच ले चित्रपटातील ओ रे पिया… या गाण्यावर कथ्थक करतानाचाही व्हिडिओ तिने शेअर केला आहे. तर काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रॉय हिच्या उमरावजान या चित्रपटातील सलाम… या गाण्यावरील तिच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

View this post on Instagram

Found my old phone, found some fun memz

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

ओ रे पिया… वर केला कथ्थक डान्स 

माधुरी दीक्षितचे तर सगळेच फॅन आहेत. कोणत्याही मुलीला माधुरीसारखा डान्स करता यावा, असे वाटत असते. अशामध्ये जान्हवीलाही तिच्या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. ओ रे पिया… गाण्यात कथ्थक करणारी जान्हवी पिवळ्या रंगांच्या ड्रेसमध्ये अगदीच खुलून दिसत आहे. या व्हिडिओ आणि फोटो सोबत जान्हवीने पोस्ट केले आहे की, मला माझा जुना फोन मिळाला आहे. त्यामध्ये काही जबरदस्त गोष्टी आहेत.

जान्हवी कपूर सध्या गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये काम करत असून ती तख्त आणि दोस्ताना २ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

हेही वाचा –

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चहामध्ये दोन वस्तू मिसळा!