घरमनोरंजनजान्हवीचा करिअरमधील 'पहिला' अवॉर्ड

जान्हवीचा करिअरमधील ‘पहिला’ अवॉर्ड

Subscribe

'धडक' चित्रपटातील अभिनयाबद्दल जान्हवीला या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं

‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या धडक चित्रपटातून जान्हवीने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये सध्या तिचाच बोलबाला आहे. आतापर्यंत अनेक अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवरही जान्हवीने आपला जलवा दाखवत प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. अल्पावधीतच जान्हवीने देशभरातील तमाम प्रेक्षकांना आणि खास करुन तरूण वर्गाला आपलं दिवानं बनवलं आहे. आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती जान्हवी कपूरच्या दुसऱ्या चित्रपटाची. धडक चित्रपटाचा दिग्दर्शक ईशान खेतनसोबतच जान्हवी तिचा दुसरा चित्रपट करत असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाचा विषय, त्यातील जान्हवीचा लूक आणि मुख्य म्हणजे चित्रपटाचं नाव या गोष्टी जरी अद्याप गुलदस्त्यात असल्या तरीही, जान्हवीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असणार यात काहीच शंका नाही. दरम्यान, जान्हवी कपूरच्या शिरपेचात नुकताच आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

जान्हवी झाली भावूक…

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची लेक असलेल्या जान्हवीला तिच्या करिअरमधील पहिला अवॉर्ड मिळाला आहे. नॉर्वेजियाच्या वाणिज्य दुतावासाने जान्हवीला ‘शूटिंग स्टार ऑफ द इअर’ हा पुरस्कार प्रदान केला. या कार्यक्रमात नॉर्वेजियाचे प्रख्यात दिग्दर्शक इराम हम उपस्थित होते. धडक चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाबद्दल तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जान्हवीने धडक चित्रपटात प्रेमात पडलेली तरुण मुलगी ते एका बाळाची आई असा प्रवास अभिनयातून साकारला आहे. तिच्याअभिनय कौशल्याचा गौरव करण्यासाठीच तिला हा ‘शूटिंग स्टार ऑफ द इअर’ अवॉर्ड देण्यात आला. मुंबईच्या मेट्रो आयनॉक्समध्ये हा अवॉर्ड सोहळा संपन्न झाला. एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी जान्हवी भलतीच भावूक झाली. ‘हा अवार्ड स्विकारल्यानंतर मला खूप आनंद झाला. मात्र, सोबतच माझ्यावरची अभियनाची जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीवही झाली’, असं मत जान्हवीने यावेळी व्यक्त केलं. याप्रसंगी जान्हवीचे बाबा बोनी कपूर आणि बहिण खुशी कपूरही उपस्थित होते.

- Advertisement -

जाव्हवीकडून अपेक्षा उंचावल्या…

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी असल्यामुळे अर्थातच प्रेक्षकांच्या जान्हवीकडून अभिनयाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ‘धडक’ चित्रपटाद्वारे जान्हवी या अपेक्षांवर खरी उतरली असली, तरी तिच्या आगामी चित्रपटांमधून तिच्याविषयीच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या असणार हे नक्की. एकीकडे जान्हवी दिग्दर्शक ईशान खेतानसोबत एक चित्रपट करत आहे, तर दुसरीकडे करण जोहर निर्मीत ‘तख्त’ या बीग बजेट ऐतिहासिक चित्रपटाचंही ती शूटिंग करते आहे. या दोन्ही चित्रपटात जान्हवी काय कमाल दाखवणार हे येणारी वेळच सांगेल.


वाचा: जान्हवी म्हणते ‘मला ‘स्टार’ नाही, ‘अभिनेत्री’ बनायचंय

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -