‘या’ कारणामुळे अभिनेत्री जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

जान्हवीने ट्रेडिशनल लूकने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु जान्हवीने असे काही केले की, नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले

Mumbai

बॉलिवूड अभनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपट रूही अफ्जा’ आणि वेब सीरीज ‘घोस्ट स्टोरीज’ च्या तयारीमध्ये व्यग्र आहे. परंतु, जान्हवी कपूर नुकतीच हरिंदर सिक्काच्या ‘कॉलिंग सहमत’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी नवी दिल्ली येथे गेली होती. जान्हवीने ट्रेडिशनल लूकने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु जान्हवीने असे काही केले की, नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

नेटकऱ्यांनी यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूरने पुस्तक प्रकाशन सोहळ्यास पुस्तक उलटं पकडल्याने ट्रोल केले आहे. प्रकाशन सोहळ्यास पुस्तक उलटं पकडल्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूरच्या कृत्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ‘नादान लडकी’चे नाव देऊन एका युजर्स ने अशी प्रतिक्रिया केली की, ‘ही अशी सेलेब्रिटी आहे, जिच्या सोबत अनेक जण सेल्फी काढायला मरतात. त्या अभिनेत्रीला साधं पुस्तक सरळ पकडता येत नाही.’ तसेच, ‘पुस्तक प्रकाशनाला पोहचली आहेस, निदान पुस्तक सरळ पकडायला तरी शिक, की वाचायला येत नाही म्हणून उलटं पकडल आहे. ‘