घरमनोरंजन‘पीएम नरेंद्र मोदी’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

‘पीएम नरेंद्र मोदी’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गीत दिले नसूनही श्रेय नामावलीत जावेद अख्तर यांचे नाव आले आहे. त्यांनी माझ नाव कस काय? हा प्रश्न उपस्थित केला आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या श्रेय नामावलीत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या चित्रपटासाठी एकही गीत लिहीले नसल्याचे अख्तर यांनी म्हंटले आहे. या श्रेय नामावलीत जावेद अख्तर, समीर आणि प्रसून जोशी अशा तिघांची नावे गीतकार म्हणून लिहिण्यात आली आहेत. तर यामध्ये माझ नाव कस काय? हा प्रश्न जावेद अख्तर यांनी ट्विट करून व्यक्त केला आहे. ‘माझ नाव पाहून मला धक्का बसला’, असे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहील आहे.

- Advertisement -

पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

‘पीएम नरेंद्र मोदी’ यांच्या चित्रपटाचे अनेक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सुरूवातीला १२ एप्रिल म्हणजेच एन निवडणुकींमध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र, तेव्हा गोव्यातील काँग्रेस विद्यार्थी सेनेने निवडणुकीच्या काळात या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. तसेच आता हा श्रेय नामावलीतील गीतकार जावेद अख्तर यांचे नावामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

निवडणुकीच्या आधी प्रदर्शित 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ऑबेरॉय यांनी केली आहे. तसेच ‘सरबजीत’, ‘मेरी कोम’ यांसारखे यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी ‘पीएम नरेंद्र मोदी’ याचे दिग्दर्शन केले आहे. तसेच या चित्रपटाची बहुतांशी शूटिंग गुजरातमध्ये झाली आहे. या चित्रपटाच्या तारखेमध्ये बदल करून १२ एप्रिल ही तारीख ५ एप्रिल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी हा सिनेमा सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -