खासदार रवी किशन यांना जयाप्रदा यांची साथ म्हणाल्या, राजकारण करू नका!

jaya_prada_ravi_kishan_
जया प्रदा, रवी किशन

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन राज्यसभेत भाजप खासदार रवी किशन यांच्यावर नाव न घेता बरसल्या. मनोरंजन विश्वाचा भाग असलेल्या लोकसभा खासदाराने (ड्रग्जच्या मुद्द्यावरुन) इंडस्ट्रीविरोधात केलेले भाष्य लज्जास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. आता रवी किशन यांच्या मदतीला भाजपा नेत्या जयाप्रदा धावून आल्या आहेत.

चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा खासदार रवी किशन यांनी सोमवारी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याला राज्यसभेच्या शून्य प्रहरात उत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या की ‘सरकारने मनोरंजन विश्वाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, कारण मनोरंजन विश्वच नेहमी सरकारच्या मदतीला येते. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यास ते पुढे येतात, पैसे देतात, सेवा बजावतात. काही जणांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करणे चुकीचे आहे” असे जया बच्चन म्हणाल्या.

जयाप्रदा यांची साथ

अभिनेत्री आणि भाजप नेते जयप्रदा यांनी रवीकिशन यांना साथ दिली आहे. त्या म्हणाल्या की, तरूणांना ड्रग्जच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवावे यासाठी मी रवीकिशन यांच्याशी सहमत आहे. आपण एकत्रितपणे आवाज उठविला पाहिजे. पण या विषयाचं राजकारण केलं जाऊ नये.

रवी किशन काय म्हणाले होते ?

रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात भाष्य केलं होतं. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुकही केलं. “भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे” या शब्दात रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुक केलं होतं.


हे ही वाचा – उर्मिला अभिनेत्री नाही सॉफ्ट पॉर्नस्टार, कंगना बरळली!