Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर मनोरंजन नागराजचा ‘झुंड’ चित्रपट ‘या’ कारणामुळे पुन्हा अडचणीत!

नागराजचा ‘झुंड’ चित्रपट ‘या’ कारणामुळे पुन्हा अडचणीत!

Mumbai
nagraj manjule
नागराज मंजुळे

दिग्दर्शक नागराज मंजूळे बिग बींना घेऊ झुंड हा चित्रपट करत आहे. अनेक अडचणीनंतर या चित्रपटाचे शुटींग सुरू होते. पण झुंड चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी हैदराबादमधील दिग्दर्शक नंदी चिन्नी कुमार यांनी चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस बजावली आहे. झुंड चित्रपटाच्या टीमनं कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अमिताभ बच्चन,निर्माते कृष्णन कुमार यांना ही नोटीस बजावली आहे.

अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे हक्क कुमार यांनी विकत घेतले होते. २०१० साली ब्राझील मध्ये अखिलेश फुटब़ल वर्ल्ड कप भारतीय संघाचा कॅप्टन होता. झोपडपट्टीत राहणारा, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या अखिलेशचे आयुष्य फुटबॉलमुळे कसे बदलते अशी चित्रपटाची कथा असणार आहे. नागराजही अखिलेशचे प्रशिक्षक विजय बरसे यांच्यावर चित्रपट बनवत आहे. पण प्रशिक्षकावर कथा करताना अखिलेश खूप महत्त्वाचा ठरतो. याच कारणानं झुंडच्या टीमकडून कॉपीराइटच उल्लंघन झाल्याचं कुमार यांचं म्हणणं आहे.

कुमार यांनी चित्रपटाला नोटीस पाठवल्यानंतर केवळ टी-सिरीजकडून नोटीसला उत्तर मिळाले असे म्हटले आहे. इतकंच नव्हे, तर झुंडच्या निर्मात्यांनी त्यांना धमकावल्याचा आरोपही नंदी यांनी केला आहे. झुंडला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळू नये अशी मागणी नंदी यांनी इंडिया मुव्ही पिक्चर्स असोसिएशन आणि तेलंगणा सिनेमा रायटर्स असोसिएशनकडे केली आहे.