घरमनोरंजनजम्पिंग जॅक जितेंद्र कपूर यांचा कोपचा गाण्यावर भन्नाट डान्स

जम्पिंग जॅक जितेंद्र कपूर यांचा कोपचा गाण्यावर भन्नाट डान्स

Subscribe

‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला ‘कोपचा’ या गाण्यावर अभिनेते जीतेंद्र कपूर यांना एवढे आवडले की, त्यांनी लकी चित्रपटाचा मुख्य अभिनेता अभय महाजनसोबत 'कोपचा' गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’ने डान्सही केला आहे.

‘लकी’ सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, ते म्हणजे ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी यांची विशेष उपस्थिती. मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला बहार आली. तसेच या ट्रेलर लाँच सोहळ्याला लकी सिनेमाचा मनोरंजक ट्रेलर दाखवण्यासोबतच सिनेमाचे नुकतेच लाँच झालेले ‘कोपचा’ गाणे ही दाखवण्यात आले. हे गाणे अभिनेते जीतेंद्र कपूर यांना एवढे आवडले की, त्यांनी लकी चित्रपटाचा मुख्य अभिनेता अभय महाजनसोबत ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’ डान्सही केला.

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ७ फेब्रुवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

- Advertisement -

‘हा ट्रेलर पाहून सिनेमाला नक्कीच बंपर ओपनिंग मिळेल, यात मला काही शंका नाही. सिनेमातले गाणेच नाही, तर कलाकारही खूप छान आहेत. सिनेमाच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘तुफान’ कलाकारांची ही फिल्म आहे. या सिनेमाला माझ्या शुभेच्छा.  – जीतेंद्र कपूर, अभिनेते

डिस्को किंग बप्पी लाहिरींना सिनेसृष्टीत यंदा ५० वर्ष पूर्ण होत असताना त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून ‘लकी’ सिनेमाच्या कोपचा गाण्याव्दारे डेब्यू झाला आहे. त्यानिमित्ताने केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला आहे. बप्पी लाहिरी यावेळी म्हणाले, ‘ज्या मराठी मातीने मला हे यश मिळवून दिले, त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझा ५० वर्षांनंतर पार्श्वगायनात डेब्यू होतोय. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे गाणे माझ्या स्टाइलचे गाणे असल्याने मला विशेष आनंद होतो आहे.

- Advertisement -

माझ्या वडिलांच्या हिम्मतवाला सिनेमाला ‘कोपचा’व्दारे दिलेला ट्रिब्यूट मला खूप आवडला. गोलमाल सीरिजच्या सर्व सिनेमांमध्ये माझे नाव लकी असल्याकारणाने लकी सिनेमाशीही आता एक खास नाते निर्माण झाले आहे. सिनेमाचे निर्माते सूरज सिंग ह्यांच्याशी माझा १६ वर्षांचा ऋणानुबंध आहे. तर सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव ह्यांच्यासोबत मी ‘सी कंपनी’ सिनेमामध्ये काम केले होते. त्यामुळे ही माझी होम प्रॉडक्शन फिल्म असल्यासारखे मला वाटते आहे.  – तुषार कपूर, बॉलीवूड अभिनेता

हा ट्रेलर लाँच सोहळा म्हणजे दुग्धशर्करा योग होता. बप्पीदा आणि जीतूसर या दोन लीविंग लिजेंड्सना एकत्र पाहण्याचा योग त्यानिमित्ताने मिळाला. या दोघांच्या सिनेमांवर आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. त्यांची कौतुकाची थाप मिळणं ही माझ्यासाठी खूप ‘लकी’ गोष्ट आहे.  – सूरज सिंग, निर्माते


वाचा – मराठी सिनेमात झळकणार ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -