जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’चे पहिले पोस्टर आऊट

या चित्रपटामध्ये जॉनसह जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत असणार

Mumbai
जॉन अब्राहम

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी थ्रिलर चित्रपट ‘अटॅक’च्या प्रदर्शनाची तारिख ठरली आहे. जॉनने या चित्रपटातील त्याचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टनुसार १४ ऑगस्ट २०२० मध्ये अटॅक हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. जॉन तिसऱ्यांदा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आपला चित्रपट प्रदर्शित करणार आहे. २०१८ मध्ये ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. तर यावर्षात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ‘बाटला हाउस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त अटॅक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये जॉनसह जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना जॉनने असे सांगितले की, ‘अटॅक’ या चित्रपटाची कहानी उत्तम असून हा चित्रपट मजेदार थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट लवकरच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. जेए एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी चांगला एक प्रयत्न केला आहे.