YAMAHA ची पॉवरफुल बाईक..फक्त ‘या’ भारतीय हिरोकडे

बॉलीवूडचा हा डॅशिंग अभिनेता 'स्पोर्ट्स बाईक्स'चा मोठा शौकिन आहे. आपल्या पर्सनॅलिटीला सूट होतील अशाच बाईक तो वापरतो.

Mumbai

बॉलीवूड स्टार्स आणि त्यांचे निरनिराळे शौक याचा सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. सेलिब्रीटींच्या दैनंदिन गोष्टी असोत किंवा त्यांचे निरनिराळे छंद त्यांच्या प्रत्येकच गोष्टीची हेडलाईन बनते. एखाद्या सुपरस्टारला महागडे कपडे किंवा दागिने मिरवण्याचा शौक असतो तर कुणाला प्राणी पाळण्याचा छंद असतो. मात्र, सेलिब्रिटीजच प्रत्येक एक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असते. बॉलीवूडचा एक डॅशिंग अभिनेता ‘स्पोर्ट्स बाईक्स’चा मोठा शौकिन आहे. आपल्या पर्सनॅलिटीला सूट होतील अशा बाईक तो वापरतो. विशेष म्हणजे तो भारतातला एकमेव अभिनेता आहे ज्याच्याकडे, YAMAHA कंपनीची सर्वात पॉवरफुल बाईक आहे.

बॉलीवूडचा ‘हँड्सम हंक’.. या बाईकचा मालक

बॉलीवूडचा हँड्सम हंक अशी ओळख असलेल्या अभिनेता जॉन अब्राहिमकडे, Yamaha कंपनीची ही पॉवरफुल बाईक आहे. ही बाईक आहे YAMAHA ची १७०० सीसी पॉवरची ‘व्ही मॅक्स’. जॉन त्याच्या दमदार पर्सनॅलिटीसाठी आणि बाईक क्रेझसाठी ओळखला जातो. स्वत:च्या मालकीची V-MAX बाईक असलेला जॉन हा एकमेव भारतीय हिरो आहे. YAMAHA कंपनीचा ब्रँड अँबेसिडर असलेल्या जॉनला कंपनीच्या वर्धापन दिनी ही बाईक देण्यात आली होती. जाणून घेऊया काय आहेत या बाईकची खास वैशिष्ट्यं.

जॉन अब्राहिम त्याच्या आलिशान V-MAX बाईकसोबत

V-MAX बाईकची वैशिष्ट्ये

YAMAHA कंपनीची ही V-Max बाईक १७०० सीसी पॉवरची आहे.

या बाईकला १ हजार ६८९ सीसीचे चार सिलेंडर आहेत. तसंच ५ स्पिड गिअर बॉक्सेसही आहेत.

ही बाईक ० ते १०० किमी अंतर केवळ २.७ सेकंदात कापते. तर तिचा टॉप स्पीड ताशी २२१ किमी आहे.