घरमनोरंजनजूही म्हणते, प्लॅस्टिक बॅगला 'हा' आहे पर्याय

जूही म्हणते, प्लॅस्टिक बॅगला ‘हा’ आहे पर्याय

Subscribe

आजपर्यंत प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची खूप हानी झाली आहे. आता ही थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. पाणी,जमीन आणि हवेतील प्रदुषण हे खास करून प्लॅस्टिकमुळे मोठ्या प्रमाणावर होतं. प्लॅस्टिकचा सर्वात मोठा धोका हा जैवसंपत्तीला आहे. यावर उपाय तुम्हाला माहितेय? यासंदर्भात अभिनेत्री जूही चावलाने एक व्हीडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री जूही चावलाने इंडोनेशियातला एक व्हीडीओ सोशलमिडीयावर शेअर केला आहे. या प्लॅस्टिक समस्येवर योग्य उपाय मिळाल्याचे जूहीने या व्हीडीओमध्ये म्हटलं आहे. प्लॅस्टिकवर इंडोनेशियाला उपाय सापडला हे कॅप्शन देत तीने हा व्हीडीओ शेअर केला आहे.

- Advertisement -

काय आहे व्हीडीओत

- Advertisement -

इंडोनेशियाने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. या प्लॅस्टिक बॅगला पर्याय म्हणून फळभाज्यांपासून बनवलेल्या बॅग बाजारत आणल्या आहेत. या बॅग शंभर टक्के नैसर्गिकरीत्या बनवल्या जातात. या बॅगांचे पाण्यात सहज विरघळतात. जूही म्हणते मला खात्री आहे की या बॅगा आपल्या देशात बघायला मिळतील.

जूहीने शेअर केलेला हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओला भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे. या बॅगांचा वापर आपल्याही देशात करावा अशी मागणी भारतीय करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -