बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला सदस्यांपैकी कोणीतरी एक जण बाहेर जातो. या आठवड्यामध्ये जुई गडकरी, सई लोकूर आणि आस्ताद काळे हे डेंजर झोनमध्ये आले आणि जुईला घराबाहेर जावं लागलं. यावेळी सई, आस्ताद, सुशांत, रेशम, पुष्कर आणि जुई असे सहा जण नॉमिनेशनमध्ये होते.
जुईने विशेष अधिकारात दिली सईला शिक्षा
प्रेक्षकांची मतं कमी पडल्यामुळे जुई गडकरी या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर तिला एक विशेष अधिकार देण्यात आला . या अधिकारानुसार जुई एका सदस्याला पुढच्या एका आठवड्यासाठी शिक्षा देऊ शकते मग ती कुठलीही शिक्षा असेल त्या सदस्याला ती पूर्ण करणे भाग असेल. जुईने सईला एक आठवडा कॉफी न पिण्याची शिक्षा देऊन तिचा राग व्यक्त केला. येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.
सदस्यांचे केले दोन गट
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकेंडचा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना गर्विष्ठ, दलबदलू, सांगकाम्या, बोअरिंग अशी नावं असलेला मुकुट बहुमतानं बहाल करायचा होता. सई लोकूरला गर्विष्ठ, उषा नाडकर्णी यांना दलबदलू, पुष्कर याला सांगकाम्या तर जुईला बोअरिंग असे नाव असलेला मुकुट देण्यात आला. महेश मांजरेकर यांनी सदस्यांचे दोन गट पाडले ज्याचे कॅप्टन पुष्कर आणि रेशम यांना केले. दोन्ही गटांना एक स्कीट तयार करायचे आहे. जो गट जिंकेल त्यांना एक गिफ्ट देण्यात येणार असून महेश मांजरेकर स्वत: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याला बक्षीस देणार आहेत असं सांगितलं. या पुढच्या टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे दिसेलच.