घरमनोरंजनप्रेमाचा उत्सव 'कागर' व्हॅलेंटाईन डेला साजरा होणार

प्रेमाचा उत्सव ‘कागर’ व्हॅलेंटाईन डेला साजरा होणार

Subscribe

रिंकू राजगुरु पुन्हा एकदा एक वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तिचा आगामी सिनेमा 'कागर' हा पुढील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शीत होणार आहे.

‘सैराट’ची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु पुन्हा एकदा एक वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तिचा आगामी सिनेमा ‘कागर’ हा पुढील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शीत होणार आहे. रिंकू राजगुरु या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे.

राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिग्दर्शक

वडील – मुलाच्या नात्यावर आधारित ‘रिंगण’ आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला ‘यंग्राड’ हे दोन चित्रपट यापूर्वी मकरंद माने यांनी दिग्दर्शित केले होते. ‘कागर’ या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

- Advertisement -

कागरची व्याख्या अधिक स्पष्ट करायला, १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन अजून फुलवायला, एकमेकांमधलं नातं घट्ट करायला आणि नजरेतील भावना अलगद अनुभवण्यासाठी आम्ही ‘कागर’ घेऊन येत आहोत.
– मकरंद माने, दिग्दर्शक

चित्रपटाचे पोस्टर रिलीज 

कागरचं पोस्टरही इतकच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पडद्याआड उभी असलेली रिंकू या पोस्टरमध्ये पहायला मिळते. पोस्टरमध्ये पडदा त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींचा गराडा आणि त्यात रिंकूच्या असलेला दिसण्यातला साज तसेच नजरेतील करारीपणा, त्यातील हावभाव विलक्षण आहेत. मात्र त्यामुळे कथानकाचा काहीच अंदाज लावता येत नाही. या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक आणि रिंकूसह असलेल्या स्टारकास्टविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -