जयललिता यांच्या दुसऱ्या बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्रीची वर्णी

तमिळनाडूची दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आणखीन एक चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या चित्रपटात ही अभिनेत्री जयललितांची भूमिका साकारणार आहे.

Mumbai
kajol and amala paul to play jayalalithaa and sasikala in another biopic
जयललिता यांच्या दुसऱ्या बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्रीची वर्णी

तमिळनाडू येथील राजकारणातील मोठे नाव म्हणजेच दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येत आहे. जया असे त्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश केलेली बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगणा राणौत ही जयललिता यांच्या जया या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय करणार आहेत. मात्र, जयललिता यांच्या जया चित्रपटाची चर्चा चालू असतानाच आता त्यांच्या जीवनावर आधारित आणखीन एक चित्रपट येणार असल्याची चर्चा होत आहे.

आणखीन एका बायोपिकची चर्चा

दिग्दर्शक केथीरेड्डी जगदीस्वरा रेड्डी हे देखील जयललिता यांच्या जीवनावर बायोपिक काढणार आहेत. शशिललिता असे या चित्रपटा नाव असणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारकाण्यासाठी अभिनेत्री काजल देवगण हिची निवड करण्यात आली आहे. तसेच जयललिता यांची विश्वासू सहकारी शशिकला यांची भूमिका अमला पॉलची निवड करण्यात आली आहे. मात्र, अभिनेत्री काजल आणि आमला पॉल या दोन्ही यासंबंधीत कोणत्याच प्रकारचा दुजोरा दिलेला नसल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तातून समोर आले आहे.

येणार सहा बायोपिक

दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आणखीन एक दिग्दर्शक बायोपिक काढणार असल्याचे समोर येत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शिनी आयर्न लेडी अशा नावाने बायोपिक काढणार असल्याचे समोर येत आहे. या बायोपिकमध्ये नित्या मेनन जयललितांची भूमिका साकारणार आहे. तसेच राम गोपाळ आणि भारथीराजाने देखील जयललिता यांच्या आयुष्यावर बायोपिक काढणार असल्याचे समोर येत आहे. तसेच जयललिता यांच्यावर सहा बायोपिक येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here