घरमनोरंजनअजयच्या 'त्या' 'ट्वीटवरून भडकली काजोल!

अजयच्या ‘त्या’ ‘ट्वीटवरून भडकली काजोल!

Subscribe

मंगळवारी अभिनेता अजय देवगणने ट्वीटरवरून आपली बायको काजोलचा नंबर ट्वीट केला. यानंतर अजय सोसल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. अजयच्या या ट्वीटवर मात्र काजोल चांगलीच वैतागली आहे.

सोमवारी रात्री अभिनेता अजय देवगणने केलेल्या अजब ट्वीटमुळे सगळेच चक्रावले होते. त्याच्या या ट्वीटची नेटिझन्सनी अजयची चांगलीच टर उडवली. त्याच्या ट्वीटला चमत्कारीक प्रतिक्रियाही दिल्या. त्यानंतर काही तासांनी अजयने आणखी एक ट्वीट करत हा प्रॅन्क असल्याचं म्हटलं. मात्र त्याच्या या प्रॅन्कवर काजोलने त्याला घरातच न घेण्याचा निर्णय घेतला आहे!

अजयने ट्वीट केलं की, ‘काजोल भारतात नाहीये, तिला व्हॉट्सअपवर 982…..0 या नंबरवर संपर्क साधा’. अजयच्या या अजब ट्वीटमुळे सगळेच चक्रावले आहेत. अजयच्या या ट्वीटवर नेटिझन्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत! यानंतर चिडलेल्या काजोलने, ‘तुझे प्रॅँक्स आता स्टुडिओच्या बाहेरसुध्दा होऊ लागले आहेत, असं दिसतंय. पण त्यांना माझ्या घरात स्थान नाही’, असं उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

अजयच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली. काहींनी तर काजोलच्या नंबरवर मेसेजेस, कॉल्स करूनही बघितला. आणि त्या मेसेजचा स्क्रीन शॉट अजयला ट्विटरच्या कॉमेंटमध्ये शेअर केला. अजयच्या या मस्तीमुळे काजोल चांगलीच वैतागली आहे. त्यामुळे चिडलेली काजोल आता अजयला खरंच घरात घेणार नाही का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -