घरमनोरंजनकाजोलने केले 'रुक रुक रुक...' ला रिक्रिएट

काजोलने केले ‘रुक रुक रुक…’ ला रिक्रिएट

Subscribe

अभिनेत्री काजोल आता ९० च्या दशकातील गाण्यावर थिरकली आहे. तब्बूवर चित्रित झालेल्या 'रुक रुक रुक...' या गाण्याचे रिक्रिएशन करण्यात आले आहे.

बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री काजोल हिने तिच्या काळातील एक गाण रिक्रिएट करून प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. व्हर्सटाइल अभिनेत्री तब्बू हिच्यावर चित्रीत झालेल्या ‘विजयपथ’ चित्रपटातील लोकप्रीय गाणं ‘रुक रुक रुक… अरे बाबा रुक’, यावर काजोलने नृत्य केल आहे. काजोलचा ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटासाठी तिने हे गाण रिक्रिएट केल आहे. अजय देवगण यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात काजोल एका आईची भूमिका साकारत आहे. ही आई आपल्याच मुलाच्या कॉजेलमध्ये शिकण्यासाठी अॅडमिशन घेते.

 

View this post on Instagram

 

Kajol recreates Ruk Ruk! Stop and watch. @kajol

A post shared by Tabu (@tabutiful) on

- Advertisement -

तब्बल २४ वर्षानंतर गाण्याच रिक्रिएशन

अजय देवगण अभिनीत विजयपथ चित्रपटात तब्बूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. १९९४ साली आलेल्या या चित्रपटाच्या तब्बल २४ वर्षांनंतर यातील हे गाण रिक्रिएट झालं आहे. यामध्ये डॅनी डॅन्जोप्पा, गुलशन ग्रोवर यांच्याची प्रमुख भूमिका होत्या. या नवीन गाण्याचे कौतुक स्वतः तब्बूने केलं आहे. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर तिने काजेलसोबतचा एक फोटो शेअर करून हे गाण नक्की बघा असे नमूद केले आहे. खरं दोघीही ९० च्या काळातील आघाडीच्या नायिका आहेत. एकेकाळी एकमेकींच्या प्रतिस्पर्धी राहणाऱ्या काजोल आणि तब्बू आता एकमेकींना प्रोत्साहन देत आहेत.

- Advertisement -

आई आणि मुलाची गोष्ट 

मितेश शहा यांनी हेलिकॉप्टर ईला या चित्रपटाची पटकथा लिहिली असून यामध्ये काजोल सिंगल मदर आणि महत्त्वाकांक्षी गायिकेची भूमिका साकारत आहे. प्रदीप सरकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नॅशनल अॅवॉर्ड विनर अभिनेता रिद्धी सेन या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याने काजोलच्या मुलाची भूमिका साकारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -