Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'त्रिभंगा'मधून काजोलची ओटीटीवर एंट्री

‘त्रिभंगा’मधून काजोलची ओटीटीवर एंट्री

सिनेमाचा टिझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या सिनेमात काजोल एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा १५ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री काजोल नेहमीच आपल्या चाहत्यांना तिच्या अभिनयातून घायाळ करत असते. तान्हाजींमध्ये साकारलेल्या दमदार भूमिकेनंतर काजोलचे सर्वत्र कौतुक झाले. तान्हाजी नंतर आता काजोल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मात्र यावेळी काजोलचा सिनेमा चित्रपटगृहात न जाता. घरात बसूनच पाहता येणार आहे. त्रिभंगा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पागहता येणार आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या सिनेमात काजोल एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा १५ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

सिनेमाचा टिझर आज सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. त्रिभंगा म्हणजे काय हे सांगत त्रिभंगा हा सिनेमा १५ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे ,असे म्हणत काजोलने सोशल मीडियावरून सिनेमाचा टिझर शेअर केला आहे. त्रिभंगामध्ये काजोल ओडिसी नर्तिका आहे. या सिनेमात एकाच कुटुंबातील तीन महिलांची कहाणी सांगण्यात आली आहे. तीन महिलांच्या तीन वेगळ्या पिढीतील गोष्टी या सिनेमात पहायल मिळणार आहेत. १९८०च्या दशकात सुरू झालेली सिनेमाची कथा वर्तमान काळात येऊन संपते. या सिनेमात काजोलसह अभिनेत्री मिथिला पालकर, तन्वी आजमी आणि कुणाल रॉय कपूर यांचाही अभिनय पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेणूका शहाणे हिने केले आहे. तर सिनेमाची निर्मिती अभिनेता, दिग्दर्शक निर्माता अजय देवगण यांने केले आहे. या सिनेमातून ओडिसा या नृत्याचा ठसा पहायला मिळणार आहे. सिनेमाचे नावही वेगळे आणि आकर्षक असल्याचे पहायला मिळत आहे. सिनेमातून तीन महिलांच्या आयुष्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. तान्हाजी द अनसंग वॉरियर नंतर काजोल आणि अजय देवगण पुन्हा एकत्र काम करत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – पोस्ट गायब झाल्यानंतर दीपिकाची चाहत्यांना गुड न्यूज!

- Advertisement -