‘कलंक’ ची पहिल्याच दिवशी कोटींची उड्डाणे

Mumbai
kalank

आलिया भट्ट, वरूण धवन,माधूरी दिक्षीत,संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असलेला करण जोहरचा ‘कलंक’ सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टपासूनच आणि ट्रेलरपासूनच ‘कलंक’ ची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरणार यात शंकाच नव्हती. त्याचप्रमाणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ट्रेड एक्सपर्टनुसार कलंक पहिल्यादिवशी 21 ते 23 कोटींची कमाई केली आहे.

बुधवारी महावीर जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे महावीर जयंतची सुट्टी, गुड फ्रायडे आणि शनिवार रविवार असा मोठा विकेंड आल्याचा फायदा चित्रपटाला होणार आहे. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर कोणातच दुसरा मोठा चित्रपट रिलीज झालेला नाहीये. त्याचमुळे कलंकची जादू बॉक्स ऑफिसवर चालणार हे नक्की.

चित्रपट समिक्षक तरण आदर्शच्यानुसार कलंक संपूर्ण देशात 4000 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला. जगभरात 5300 स्क्रिनवर ‘कलंक’ रिलीज करण्यात आला आहे. अभिषेक वर्मनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

 

वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर  आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने 20 वर्षानंतर माधुरी-संजय दत्त एकत्र आले. तर करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

‘हा एक असा चित्रपट आहे, ज्यावर मी सर्वस्व झोकून काम केलं आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. कलंकची कथा भारत-पाकिस्तान फाळणी पूर्वीची आहे. लाहोर जवळच्या हुसैनाबाद शहरात लोहार काम करणारे बहुसंख्य मुस्लिम राहत असतं. असं लिहित करणनं या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. एक महिना आधीच या चित्रपटाच्या अडव्हान्स बुकींगला सुरूवात झाली होती.