घरमनोरंजनशाहरूख खानच्या तोंडाला काळे फासू

शाहरूख खानच्या तोंडाला काळे फासू

Subscribe

शाहरूख खानच्या तोंडाला काळे फासू अशी धमकी ओडिसातील कलिंग सेनेनं दिली आहे. १७ वर्षापूर्वी शाहरूख खानचा अशोका हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये कलिंग लोकांच्या भावना दुखावल्याचं कलिंग सेनेनं  म्हटलं आहे.

शाहरूख खानच्या तोंडाला काळे फासू अशी धमकी ओडिसातील कलिंग सेनेनं दिली आहे. १७ वर्षापूर्वी शाहरूख खानचा अशोका हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये कलिंग लोकांच्या भावना दुखावल्याचं कलिंग सेनेनं  म्हटलं आहे. शिवाय, या चित्रपटात शाहरुख खाननं इतिहासाची चुकीची माहिती दिली असा देखील त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ओडिशामध्ये आल्यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासू अशी धमकी कलिंग सेनेनं दिली आहे. या धमकीनंतर शाहरुखच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शनिवारी ओडिशा पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यात आली. धमकीनंतर आवश्यक ती काळजी घेण्यात आल्याचं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. यावरच कलिंग सेना थांबली नसून त्यांनी मेन्स हॉकी वर्ल्ड कपसाठी शाहरुख खान २७ नोव्हेंबर रोजी कलिंग स्टेडियम येईल. त्यावेळी देखील त्याला काळे झेंडे दाखवू असा इशारा देखील कलिंग सेनेनं दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -