कंगनाने काही तासात मुंबईला POK वरुन तालिबान पर्यंत नेलं!

kanganaranaut
कंगना रणावत

कंगनाने केलेली ‘मुंबईची पाकशी तुलना’, आणि नंतर मुंबईकरांना दिलेलं आव्हान या विधानांवर चहूबाजूने टीका होत असताना कंगना काही शांत बसायला तयार नाहीये. मुंबईबद्दल अभिनेत्री कंगणा रनौतनं केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईतलं राजकारण चांगलंच तापलं आहे. ‘संजय राऊतांनी मला मुंबईत न येण्याची धमकी दिली. ‘मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल, त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. वचन आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र’, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. ‘मी ९ सप्टेंबरला मुंबईत ये आहे. कुणाच्या बापाची हिंमत असेल, तर मला अडवून दाखवा’, असं ट्वीट कंगणानं केलं होतं. त्यावर राऊतांनी हे मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा असं म्हटलं.

त्यावर आता कंगनाने तिला विरोध करणाऱ्यांविषयी खरमरीतपणे हेही लिहिलं आहे, “महाराष्ट्राबद्दल हे असं प्रेम दाखवणाऱ्या सगळ्या चापलुसांनी हे लक्षात घ्या की, मराठी मनाचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांना मोठ्या पडद्यावर दाखवणारी हिंदी चित्रपटांच्या इतिहासातली मी पहिली अभिनेत्री दिग्दर्शक आह. आणि याच लोकांनी या चित्रपटांना प्रदर्शित होण्याआधी विरोध केला होता.”

पुढे कंगनाने आणखी एक ट्विट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, ज्यांनी मराठी अभिमान जपला आहे हा महाराष्ट्र त्यांचा आहे.

आता मुंबईची तुनला तालिबानशी

कंगनाच्या मुंबईवरली वक्तव्यावर अनिल देशमुख यांनी मुंबईत राहण्याचा अधिकार नाही असं म्हटलं होतं. त्यावर आता कंगनाने गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांना उत्तर देताना लिहिले – तुम्ही माझ्या डेमोक्रॅट हक्कांवर स्वत: हून निर्णय घेत आहेत. आता तुम्ही एका दिवसात पीओके बरोबर तालिबान झालात.

मुंबईला रक्ताची चटक लागली आहे

कंगना विरुद्ध शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार असं Tweet युद्ध सुरूच आहे. कंगना राणावत हिच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने ठाण्यात कंगणाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले. त्यानंतर भडकलेल्या कंगनाने म्हटलं आहे की, “सुशांतला आणि साधूंना मारल्यानंतर आता प्रशासनाविरोधात माझं मत व्यक्त केलं म्हणून माझ्या पोस्टरला जोडे मारताय. मुंबईला रक्ताची चटक लागली आहे वाटतं “, असं कंगनाने लिहिलं आहे.

एक नजर सुशांत प्रकरणात कंगनाच्या गाजलेल्या ट्विटवर