घरट्रेंडिंग'मी शिवसेनेला मत दिलं', खोटारडेपणा उघड केल्यानंतर कंगनाची पत्रकाराला कोर्टात खेचण्याची धमकी

‘मी शिवसेनेला मत दिलं’, खोटारडेपणा उघड केल्यानंतर कंगनाची पत्रकाराला कोर्टात खेचण्याची धमकी

Subscribe

कंगना राणावत आपल्या ट्विटर हँडलवर वाटेल ते बडबडगीते गाऊन रोज राजकारणी, कलाकार यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने आपला मोर्चा पत्रकारांकडे वळविला असून पत्रकारांना तुरुंगात डांबण्याची धमकी दिली आहे. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सांगितले होते की, “मला भाजपला मत द्यायचे होते, पण युती असल्यामुळे मला नाईलाजाने शिवसेनेला मतदान करावे लागले.” कंगनाच्या या दाव्यानंतर पत्रकार कमलेश सुतार यांनी आक्षेप घेतला. कंगना जिथे राहते तिथल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २०१९ साली दोन्ही वेळा भाजपचे उमेदवार उभे होते. हे तथ्य ट्विटरवर मांडल्यानंतर कंगनाचाच चांगलाच जळफळाट झाला असून तिने थेट संबंधित पत्रकाराला कोर्टात खेचण्याची धमकी दिली आहे.

- Advertisement -

टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला १६ सप्टेंबर रोजी कंगनाने एक मुलाखत दिली होती. यात तिने महायुतीमुळे तिला जबरदस्ती शिवसेनेला मतदान करावे लागले होते, असे म्हटले आहे. मात्र पत्रकार कमलेश सुतार यांनी कंगना राहत असलेल्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. कमलेश सुतार यांनी ट्विटरवर ही माहिती जाहीर केल्यानंतर कंगनाचा खोटेपणा उघड झाला. त्यानंतर कंगनाने सलग ट्विट करत कमलेश सुतार यांचा आरोप तर खोडून काढलाच शिवाय त्यांना कोर्टात खेचण्याची धमकीही दिली.

- Advertisement -

पत्रकार कमलेश सुतार यांनी कंगनाच्या मुलाखतीमधील फोलपणा उघड केल्यानंतर कंगनाने पुन्हा ट्विट करत मी लोकसभेला शिवसेनेला मतदान केले होते. तुम्ही विधानसभेबाबत बोलत असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतही पत्रकार कमलेश सुतार यांनी लोकसभेला भाजपच्याच पुनम महाजन निवडणूक लढवत असल्याची आठवण कंगनाला करुन दिली.

वस्तूस्थिती अशी आहे की,

२०१४ साली लोकसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना युती झाली होती. त्यावेळी विद्यमान काँग्रेस खासदार प्रिया दत्त यांचा पराभव भाजपच्या पुनम महाजन यांनी केला होता. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. मात्र वांद्रे पश्चिम मतदारसंघात आशिष शेलार यांनी भरघोस मते मिळवत विजय प्राप्त केला होता. तसेच २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहिल्यामुळे लोकसभेला पुनम महाजन आणि  विधानसभेला आशिष शेलार हे भाजपचेच उमेदवार कायम राहिले होते. त्यामुळे चारही निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही.

खोटेपणा उघड झाल्यानतंर कंगना नरमली

कमलेश सुतार यांनी खोटे दाव्याचा भांडाफोड केल्यानंतर ट्विटरवरही अनेकांनी कंगनाची शाळा घ्यायला सुरुवात केली. ती कशी वारंवार खोटे बोलते, याचे दाखले नेटिझन्सनी दिले. यानंतर कंगनाने नरमाईची भूमिका घेत आज सकाळी पुन्हा एकदा ट्विट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी, माझे कुटुंब आणि बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी शिवसेनेलाच मतदान केले होते. मी माहिती मागवली आहे. त्यानंतर यावर बोलेन, अशी नवी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

या प्रकरणावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप आणि कंगनावर निशाणा साधला आहे. कंगनाने महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकरबद्दल अत्यंत हीन शब्दात टीका करुनही भाजप शांते बसले. आता तर तिने वांद्रे पश्चिम मतदारसंघात शिवसेनेला मतदान केल्याचे खोटे सांगितले आहे, तरिही आमदार आशिष शेलार गप्प का? असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -