‘रक्षक झाले भक्षक’ जड अंत:करणाने मुंबई सोडून जात आहे, कंगनाचा टोला!

kangana ranaut

काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज अभिनेत्री कंगना राणावत मुंबईहून मनालीला निघाली आहे. बहिण रंगोलीही कंगनासोबत आहे. मुंबई विमानतळावर कंगनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ४०- ५० सीआयएसएफचे जवान विमानतळावर कंगनाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र जाता जातही कंगनाने नव्या  वादाला तोंड फोडलय असच म्हणावं लागले. कारण मनालीला निघण्याआधी कंगनाने केलेले २ ट्विट पुन्हा एकदा नवीन वादाचे कारणीभूत ठरणार आहेत.

गेले काही दिवस कंगना आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युध्द रंगलं आहे. कंगनाने सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनेक विधाने केली असून एका विधानात तिने मुंबई पोलिसांबाबत अविश्वास दर्शवणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर टीका करण्यास सुरूवात केली. तसेच मुंबई महापालिकेनेही तिच्या वांद्रे येथील कार्यालयातवर अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत कारवाई केली. यादरम्यान कंगना सतत ट्विटरवर ट्विट करत होती, व्हिडिओ, फोटो शेअर करत होती. पालिकेच्या कारावाईदरम्यान तीने बाबर, पाकिस्तान असे शब्द वापरत फोटो शेअर केले होते त्यामुळे नवीन वाद रंगला होता. आता घरी जातानाही कंगना गप्प बसली नाहीये. तीने पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर नकळत निशाणा साधला आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जड अंत:करणाने मुंबई सोडून जात आहे. या दिवसांमध्ये मला जो त्रास दिला गेला. माझं घर तोडण्याचा प्रयत्न झाला. माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याची धमकी मला मिळाली. यामुळे सुरक्षेखातर माझ्या आजूबाजूला सुरक्षा तैनात करण्यात आली. यावरून मी म्हटल्याप्रमाणे POK प्रमाणेच मला वागणूक दिली गेली आहे.

तर कंगनाने आणखी एक ट्विट केलं आहे. त्यात तीने पोलीस आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

खरतर याच पोलिसांनी कंगनाला मुंबईत येताना आणि घरी जाताना सुरक्षा दिली. मात्र आजही कंगनाचा पोलिसांवर विश्वास नाही असचं दिसतय. कंगनाच्या या ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटणार हे नक्की.