घरमनोरंजनअभिनेत्री कंगना राणावतला मुंबई न्यायालयाचे समन्स

अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई न्यायालयाचे समन्स

Subscribe

अभिनेत्री कंगना राणावत आणि बहिण रंगोली चंडेल यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत मुंबई न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात अभिनेता आदित्य पांचोलीने पोलीस ठाणे गाठत तिच्याविरोधात मानहानी केल्याची तक्रार केली. मात्र सुनावणीसाठी न्यायालयात हजर न राहिल्याने शेवटी कोर्टाने कंगनासह तिची बहीण रंगोलीला समन्स बजावले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे.

काही वर्षांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावतने अभिनेता आदित्य पांचोलीवर शारीरिक हिंसा आणि मारहाणीचा आरोप केला होता. त्यामुळे २०१७ मध्ये अभिनेता आदित्य पांचोलीने अभिनेत्री कंगना राणावत विरोधात मानहानी केल्याची याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने अभिनेत्री कंगना आणि रंगोलीला समन्स जारी केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे. या वेळी कंगना आणि रंगोलीला न्यायालयात उपस्थित राहावेच लागणार आहे.

- Advertisement -

अभिनेत्री कंगना राणावत- आदित्य पांचोली वाद

आदित्यचे नाव न घेता कंगनाने त्याच्यासोबतच्या नात्याबाबत काही गोष्टींचा खुलासा केला होता. आदित्य आणि मी नवरा-बायकोप्रमाणेच राहत होतो. आदित्य माझ्या वडिलांच्या वयाचा होता. त्यावेळी मी केवळ १७ वर्षांची होते. त्यावेळी झालेल्या मारहाणीत त्याने माझ्या डोक्यावर जोराचा वार केल्याने मी माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर मीसुद्धा माझ्या सॅन्डलने आदित्यच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे त्यालासुद्धा दुखापत झाली. मात्र त्यानंतर मी आदित्यविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. कंगनाने केलेल्या आरोपानंतर आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब आदित्यच्या मदतीला आली. मी आदित्यला सर्वाधिक ओळखते. आदित्य कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवत नाही. त्यामुळे भूतकाळात काय झाले हे मला माहीत असल्याचे आदित्य पांचोलीच्या पत्नीने सांगितले.

अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांना एकूण चार समन्स देण्यात आले आहेत. यामध्ये अभिनेता आदित्य पांचोली आणि त्याच्या पत्नीने अभिनेत्री कंगणा राणावत आणि रंगोली विरोधात प्रत्येकी दोन समन्स बजावण्यात आले आहेत.
श्रेया श्रीवास्तव, आदित्य पांचोलीच्या वकील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -