घरमनोरंजनजावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही - कंगणा

जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही – कंगणा

Subscribe

अभिनेत्री कंगना रणौत हीने शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, त्याने नवज्योत सिद्धू यांच्यावर देखील टीका केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीफचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. देशभरातून या हल्ल्याच्या निषेर्धात अनेक मोर्चे, कँडल मार्च काढण्यात आले. अनेक वेगवेगळ्या स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. दरम्यान, बॉलिवूडची क्विन कंगणा रणौतने देखील संताप व्यक्त केलाय. पाकिस्तान हा फक्त आपल्या देशावरच नाही, तर आपल्या सहनशक्तीवरही वार करत आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवायलाच हवा, असा संताप तिने व्यक्त केला आहे. त्याचवेळी तिने जेष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. तसेच तिने नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर देखील टीका केली आहे.

चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार देशद्रोही

पुलवामा हल्लाबाबत प्रतिक्रिया देताना कंगणा अशी म्हणाली की, ‘जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे दोघे ही देशद्रोही आहेत. जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे पाकिस्तानच्या सांकृतिक कार्यक्रमाचे आदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ असं म्हणणाऱ्याचे समर्थन करतात. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही, जावेद अख्तर आणि शबाना आजमी पाकिस्तानमध्ये जाऊन कार्यक्रम करण्याची काय गरज आहे? असा प्रश्नही कंगनाने उपस्थित केला आहे. चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार देशद्रोही आहे, असे ती म्हटली आहे.

- Advertisement -

शबाना आझमींनी रद्द केला पाकिस्तान दौरा

कराची आर्ट काऊंसिलने शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना कराची येथे कैफी आजमी यांच्या कवितावर होणाऱ्या लिटरेचर कॉन्फरन्स या कार्यक्रमाचे आमंत्रण आले होते. परंतू पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर या दोघांनीही कार्यक्रमाला जाणे रद्द केले.तरीही कंगना रणौत हीने शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्यावर आरोप केला आहे.


वाचा- Pulwama Attack : जावेद अख्तर – शबाना आझमींनी रद्द केला पाकिस्तान दौरा

- Advertisement -

सिद्धू यांच्यावर ही टीका

काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिद्धू यांनी पुलवामा हल्लयाबद्दल ‘पाकिस्तानशी चर्चा करुन तोडगा काढावा’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सिद्धू पुन्हा टीकेची झोड सुरु झाली आहे. सिध्दू यांनी असं ही म्हटले होते की, दहशतवादाला धर्म, देश नसतो’, याच वक्तव्यावर कंगणाने सिद्धू यांच्यावर देखील टीका केली आहे. ‘जवानांवर हल्ला केला जात आहे आणि काही लोक हिंसा, अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत, अशा लोकांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढायला हवी,’ असे मत तिने व्यक्त केले आहे.

शबाना आझमींचे कंगनाला प्रत्युत्तर

कंगनाने केलेल्या आरोपानंतर शबाना आझमींनी तिच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले की, पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल शहीद जवांनाबाबत दुःख व्यक्त करत आहे. तसेच या हल्ल्याचा निषेध करत आहे. अशा वेळी वैयक्तिक हल्ल्याला काही महत्व आहे का? देव आपलं भलं करो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -