घरमनोरंजनम्हणून कंगनाने केले १० दिवसांत एवढे वजन कमी!

म्हणून कंगनाने केले १० दिवसांत एवढे वजन कमी!

Subscribe

जगभर प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर वॉक करण्यासाठी कंगना प्रचंड मेहनत घेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी पंगा या चित्रपटासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे खूपच चर्चेत आहे. कंगना पंगा या चित्रपटात कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेकरिता तिने तिचे जास्त वजन वाढविले होते. परंतु नुकताच सुरू झालेला आणि जगभर प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर वॉक करण्यासाठी कंगना प्रचंड मेहनत घेत आहे. या करिता कंगनाने सतत व्यायाम करत, मेहनत घेऊन १० दिवसात पाच किलो वजन कमी केले आहे.

- Advertisement -

कंगनाने घेतलेली ही मेहनत आणि हे कमी केलेले वजन ते फक्त कान्स फेस्टिव्हल करता केल्याचे समजते आहे. या साऱ्याची झलक कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बघायला मिळते. तसेच कंगनाच्या टीमने तिचे पहिलेचे आणि आता वजन कमी केल्याचे फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

The grind is real. This is what it takes to get red carpet ready for cannes. ? . . . . #Cannes2019 #KanganaAtCannes

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

- Advertisement -

हे वजन कमी करण्यासाठी योगेश भटेजा यांनी विशेष मदत केली आहे. यावेळी क्विन कंगनाच्या फिटनेस ट्रेनरने असे सांगितले की, कंगनाने पंगा साठी वजन वाढवले होते. यासाठी तिला अधिक कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा समावेश तिच्या डाएटमध्ये करावा लागला. कंगनासाठी हे अजिबात सोपे नव्हते. वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणं गरजेचे होते. पंगाच्या शुटिंगनंतर कंगनाने एका दिवसात दोनवेळा वर्कआऊट करत १० दिवसात वजन कमी करण्याचे टार्गेट पुर्ण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -