कंगनाने दिले राज्य सरकारला उत्तर; म्हणाली, ‘मी लवकरच परत येईन’

कंगना रनौतने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रातील पप्पू सेना म्हणत मी लवकरच परत येत असल्याचे उत्तर दिले आहे. तसेच वांद्रे कोर्टाने कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीवरून कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोली यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. याला ट्विटरच्या माध्यमातून कंगनाने उत्तर दिले आहे. तसेच सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत भारतीय पोषाखातील फोटोही शेअर केला आहे.

काय म्हटले आहे कंगनाने

कोणी कोणी नवरात्रीचे उपवास धरले आहेत. मी सुद्धा उपवास करत आहे. हा फोटो आजच्या सेलिब्रेशनचा आहे. दरम्यान, माझ्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अस वाटतंय की महाराष्ट्रात बसलेली पप्पू सेनाला माझ्याशी खुपच स्नेह आहे. माझी इतकी आठवण काढू नका, मी लवकरच तिथे येईन.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणापासून कंगना आणि राज्य सरकार यांच्या शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. या न त्या कारणावरून एकमेकांवर कुरहोडी करताना हे सेलिब्रिटी दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कंगनाने वारंवार टीका केली आहे. तर संजय राऊत यांनीही कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. अशात कंगनाने मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला, मात्र आता मी परत येत असल्याचे तिने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

हेही वाचा –

फडणविसांच्या खुर्चीला दणका देणाऱ्या पावसातील ‘त्या’ ऐतिहासिक सभेची वर्षपूर्ती!