Sushant Sucide Case: कंगनाचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ सात प्रश्न!

Kangana Ranaut Targets Aditya Thackrey And Asks Him Seven Questions Related To Sushant Singh Rajput
Sushant Sucide Case: कंगनाचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ सात प्रश्न!

अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणी दिवसेंदिवस गुंता वाढत चालला आहे. आता या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. आता राजकीय हस्तक्षेप या प्रकरणात वाढत आहे. अनेकांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता या प्रकरणात त्यांचा संबंध असल्याचे म्हटले आहे. यावर  महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रीया देत आपली बाजू मांडली. महाराष्ट्र सरकारचे यश अनेकांना खुपते आहे. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणात माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबीयांवर नाहक चिखलफेक केली जाते आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत काही प्रश्न विचारले आहेत.

पहिल्या ट्विटमध्ये कंगनाने राजकारणाबद्दल टीका केली आहे. ती म्हणाली, गलिच्छ राजकारणाबद्दल कोण बोलतय बघा. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी मिळाली हा गलिच्छ राजकारणाच्या अभ्यासाचा विषय आहे सर. हे सगळं विसरा आणि आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरं तुमच्या वडिलांना द्यायला सांगा.

१. रिया चक्रवर्ती कुठे आहे?

  1. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची तक्रार दाखल करून का घेतली नाही?
  2. फेब्रुवारी माहिन्यात सुशांत सिंह राजपुतच्या जिवाला धोका आहे, अशी तक्रार करण्यात आली होती मग पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे का म्हटले?
  3. आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट्स किंवा सुशांतच्या फोनचा डेटा का नाही. ज्यामध्ये तो आत्महत्येपूर्वी कुणाशी बोलला हे कळेल?
  4. बिहारचे आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाइन का करण्यात आलं.

६. सीबीआय चौकशीसाठी का घाबरता?

  1. रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतचे पैसे का घेतले?

गेले काही दिवस अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत याची केस अखेर सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे. केंद्राने बिहार सरकारची सीबीआय चौकशीच्या शिफारसीची मागणी मंजूर केली आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वकिलांनी ही माहिती दिली. आता या केसची सीबीआय चौकशी होणार आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी केली जावी ही मागणी सोशल मीडियावर लावून धरण्यात आली होती. तसेच सुशांतच्या वडिलांनीही ही मागणी बिहार सरकारकडे केली होती.