दोन मिनिटांचा रोल मिळवण्यासाठी हिरोसोबत झोपावं लागतं, कंगनाचा गौप्यस्फोट

kangana ranaut tweet against jaya bachchan over thali comment
दोन मिनिटांचा रोल मिळवण्यासाठी हिरोसोबत झोपावं लागतं, कंगनाचा गौप्यस्फोट

मंगळवारी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाबाबत संसदेत भाष्य केलं होतं. ‘ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करता.’ असं म्हणतं त्यांनी काही कलाकारांना टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर आता कंगनानं आज ट्विट करत जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मला बॉलिवूड इंडस्ट्रीनं कोणतं ताट दिलं? असा सवाल करत हिरोसोबत झोपल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतं असल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट केला.

नक्की काय म्हणाली कंगना?

काही वेळापूर्वी कंगना ट्विट करत म्हणाली की, ‘कोणतं ताट दिलं आहे जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने? एक ताट मिळतं होतं. ज्यामध्ये दोन मिनिटांचा रोल, आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळत होता. ते पण हिरो सोबत झोपल्यानंतर. मी या इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवला. ताट देशभक्तीवरील आधारित चित्रपटांनी सजवलं. जया जी, हे माझं स्वतःचं ताट आहे, तुमचं नाही.’

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

‘बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री दररोज ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती चांगली नसून काही गोष्टींकडून लक्ष हटवण्यासाठी आमचा वापर केला जात आहे. सोशल मीडियावर आमच्याबद्दल वाटेल ते बोललं जात आहे. आम्हाला सरकारकडून देखील समर्थन मिळत नाही आहे. ज्यांनी या इंडस्ट्रीच्या मदतीने नाव कमावलं आहे, तेच आता इंडस्ट्रीला ‘गटार’ म्हणत आहे. याला माझा पूर्णपणे विरोध आहे. लोकांशी अशा प्रकारची भाषा वापरू नये, असं सरकारकडून सांगण्यात यावं, अशी माझी आशा आहे’, असं जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या होत्या.