घरमनोरंजनकंगनाच्या 'मणिकर्णिका'चा टिझर लवकरच!

कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा टिझर लवकरच!

Subscribe

पारंपारिक मराठमोळ्या वेशातील कंगना आणि तिच्या पाठीमागे गणपतीची मूर्ती असलेला एक भन्नाट फोटो, सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे.

बॉलीवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनावत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.  ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा कंगनाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बी-टाऊनमध्ये गेल्या काही काळापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. याशिवाय कंगनाच्या चाहत्यांमध्येही ‘मणिकर्णिका’ चित्रपटाविषयी तितकीच उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर आता चाहत्यांसाठी एक नवीन खुशखबर समोर आली आहे. येत्या २ ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी मणिकर्णिका चित्रपटाचा टिझर रिलीज होत आहे. कंगना रनावतच्या टीमने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चित्रपटाच्या टिझरची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी चित्रपटातील कंगनाचा एक खास फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशात दिसते आहे. पारंपारिक मराठमोळ्या वेशातील कंगना आणि तिच्या पाठीमागे गणपतीची मूर्ती असलेला हा लूक सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे. कंगनाच्या फॅन्सकडून या फोटोला भरभरुन पसंती मिळते आहे.

- Advertisement -

कंगनाच्या विविधरंगी भूमिका

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी कंगना, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठीही प्रसिद्ध आहे. एकीकडे मणिकर्णिकामध्ये ऐतिहासिक पात्र साकारणारी कंगना, दुसरीकडे ‘कब्बडी’ खेळावर आधारित एका चित्रपटात खेळाडूची भूमिका साकारते आहे. अश्विनी अय्यर तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, २०१९ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं समजतंय. याशिवाय कंगना सध्या ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेता राजकुमार राव या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या वर्षाअखेरीपर्यंत अनुराग बासूच्या ‘इमली’ या चित्रपटाचं शूटिंगही कंगना सुरु करणार असल्याची खबर मिळते आहे. त्यामुळे येत्या काळात कंगना एकाहून एक दमदार चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येणार यात शंका नाही.


वाचा : ‘पंगा’ घेण्यासाठी कंगना तयार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -