कलम ३७७ रद्द; ‘माझ्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस’

६ सप्टेंबर २०१८ हा दिवस खऱ्या अर्धाने माझ्यासाठी आणि त्या समुदायासाठी स्वातंत्र्यांचा दिवस असल्याचे करण जोहरने म्हटलं आहे.

Mumbai
karan johar after section 377 gone within me and from the community i felt freedom
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर

‘कलम ३७७ रद्द करण्याचा दिवस हा माझ्यासाठी आणि त्या समुदायासाठी स्वातंत्र्याचा दिवस होता’, असं बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यावेळी करण जोहर म्हणाला की, ‘जेव्हा कलम ३७७ रद्द करण्यात आला. त्या दिवशी मी सकाळी उठलो आणि रडलो. माझ्यासाठी आणि त्या समुदायासाठी हा दिवस स्वातंत्र्याचा दिवस आहे. तो दिवस ऐतिहासिक होता आणि हा क्षण फक्त एका खऱ्या प्रेमाचा आनंद साजरा करण्यासाठी होता.’

करण पुढे असं म्हणाला की, ‘६ सेप्टेंबर २०१८ हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता. त्या दिवशी माझ्या वडिलांचा यश जोहर यांचा वाढदिवस होता. माझे वडिल हे माझ्या अत्यंत जवळचे आहेत. योगायोगाने हा दिवस एकत्र आला आणि अधिक विशेष झाला.’ जरी कायदेशीररित्या समलैंगिता मान्य झाली असली तरी अद्याप ही लोक उघडपणे स्वीकारत नाहीत. यासाठी थोडा वेळा लागेल, असा विश्वास करण जोहरने व्यक्त केला.

‘कालांतराने लोक या गोष्टीचा अधिक वापर करण्यास सुरुवात करतील. सिनेमा, साहित्य आणि बातम्यांमधून समाजात हळूहळू बदल घडून येण्यास थोडा वेळ लागेल. काही चित्रपटात समलैंगिकेतेविषयी खुलेपणाने बोले जात आहे. याविषयी सतत माहिती येणे गरजेचे आहे. मला खात्री आहे यापुढेच पाऊल हे विविह असेल. तसंच लवकरच समलैगिंक विवाह देशात स्वीकारला जाईल असी माझी खात्री आहे. या देशाचा नागरिक म्हणून हा बदल होण्याची मी प्रतीक्षा करेन.’ असं करण जोहने मुलाखत देताना सांगितलं.