Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन करण जोहरने मागितली भांडारकरांची माफी, म्हणाला मी तुमचे नुकसान नाही करणार

करण जोहरने मागितली भांडारकरांची माफी, म्हणाला मी तुमचे नुकसान नाही करणार

धूर भांडारकर यांची माफी मागणारे एक पत्र शेअर केले आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवुड निर्माते करण जोहर आणि मधूर भांडारकर यांच्यात कार्यक्रमाच्या नावावरून वाद सुरू आहे. मधूर भांडारकर यांच्या येणाऱ्या आगामी प्रोजेक्टचे नाव करण जोहर याने चोरले आहे असा आरोप निर्माते मधूर भांडारकर यांनी केला आहे. यावर करण जोहरेने आपले मौन सोडले आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मधूर भांडारकरांची माफी मागितली आहे. यासंबंधीची एक पोस्ट करणने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

करण जोहरने त्याच्या ट्विट वरून मधूर भांडारकर यांची माफी मागणारे एक पत्र शेअर केले आहे. ज्यात करणने असे लिहिले आहे की, ‘प्रिय मधूर भांडारकर आपली मैत्री खूप जूनी आहे. याच नात्याच्या जोरावर आपण इंडस्ट्रीमध्ये कितीतरी वर्षे काम केले आहे. इतक्या वर्षांत मी तुमच्या कामाचा मोठा चाहता झालो आहे. मी नेहमी तुमच्या विषयी नेहमीच चांगला विचार केला आहे.’ असे म्हणत करण पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

या पत्रात पुढे असे लिहिले आहे की, ‘मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर नाराज आहात. गेल्या काही दिवसांपासून माझ्यामुळे तुम्हाला झालेल्या असुविधेसाठी मी तुमची माफी मागतो. पण मी हे स्पष्टपणे सांगतो की,आम्ही या नव्या आणि वेगळे टायटल या नॉन फिक्शन फ्रेंचाइजचा फॉरमेट लक्षात ठेवूनच निवडले आहे. आम्हाला वाटले नव्हते की तुम्ही आमच्यावर इतके नाराज व्हाल. त्यामुळे मी तुमची माफी मागतो.’

- Advertisement -

निर्माता करण जोहरचा ‘फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवुड वाइफ्स’ हा कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या कार्यक्रमाच्या शिर्षका विषयी त्यांनी निर्माते मधूर भांडारकर यांना विचारले होते. पण भांडारकर यांनी या शिर्षकासाठी नाही असे म्हटले होते. कारण त्यांच्या येणाऱ्या नवीन प्रोजेक्टचे नावही तेच होते. मी नाही म्हणूनही करणने हे शिर्षक आपल्या कार्यक्रमाला दिले असा आरोप मधूर भांडारकर यांनी केला होता. यावर करणेने माफी मागताना असे म्हटले आहे की, मी तुम्हाला विश्नासाने सांगतो की, या कार्यक्रमाचा फॉर्मेट, प्रेक्षक आणि कार्यक्रमाचे नाव हे वेगळे आहे. या कार्यक्रमामुळे तुमच्या प्रोजेक्टचे कोणतेही नुकसान होणार नाही.


हेही वाचा – ब्रेकअपनंतर आमिरची मुलगी पुन्हा प्रेमात, फिटनेस कोचलाच करतेय डेट

- Advertisement -