घरमनोरंजनकरण जोहरला दिलासा; ड्रग्ज प्रकरणी NCB ने दिली क्लीन चीट

करण जोहरला दिलासा; ड्रग्ज प्रकरणी NCB ने दिली क्लीन चीट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान करण जोहरच्या घरात मागील वर्षी झालेल्या पार्टीचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला होता. करण जोहर आणि त्याच्या पार्टीत उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींनी ड्रग्सचे सेवन केले होते, असे हा व्हिडीओ पाहून म्हटले जात होते. मात्र, आता एनसीबीने या व्हिडीओची पुन्हा तपासणी केली आहे. या तपासानंतर करण जोहरच्या पार्टीत कोणत्याही सेलिब्रिटींनी ड्रग्स सेवन केले नव्हते, असे म्हणत करण जोहरला क्लीन चीट देण्यात आली आहे.

- Advertisement -

फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या या पार्टी व्हिडीओला क्लीन चीट दिली असल्याचे वृत्त एनडीटीव्हीच्या अहवालानुसार देण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्हाईट लाईन ट्यूबलाइटचा प्रकाश असू शकतो, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या अहवालानुसार, कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटींनी ड्रग्स सेवन केल्याचे आढळले  नाही. तसेच व्हिडीओमध्ये कोणताही चुकीचा पदार्थ किंवा अमली पदार्थ सापडलेला नसल्याने, या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण

अकाली शिरोमणी दलचे आमदार मजिंदर सिंह सिरसा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत करण जोहरच्या पार्टीत ड्रग्जचे सेवन होत असल्याचा आरोप केला होता. ‘बॉलिवूडचे गर्विष्ठ तारे नशेची मिजास मिरवताना पाहा’, असे कॅप्शन देत सिरसा यांनी व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर करणने त्या पार्टीला इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते. आठवडाभर काम करुन दमल्यानंतर थोडा मोकळा वेळ घालवण्यासाठी ती पार्टी होती. मी तो व्हिडीओ शूट केला. जर तिथे भलते सलते काही घडत असते, तर व्हिडीओ शूट करण्याइतपत मी मूर्ख आहे का?, ड्रग्जचे सेवन केले असते, तर आम्ही व्हिडीओ शेअर केला तरी असता का?, असा सवाल उपस्थित केला होता.

- Advertisement -

हेही वाचा –

संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपाला सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -