सौरव गांगुलीची ‘दादागिरी’

लवकरच बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेटचे कर्णधार सौरव गांगुलीच्या आयुष्यावर लवकरच एक सिनेमा येऊ शकतो असे म्हटले जात आहे

Mumbai
Sourav Ganguly
सौरव गांगुली

बॉलिवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचा ट्रेंड सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आयुष्यावर आलेला ‘एम एस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. याशिवाय ‘दंगल’, ‘मेरी कॉम’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘सूरमा’, ‘गोल्ड’ यांसारखे अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेले. या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही मोठ्याप्रमाणावर पंसती मिळाली.

 करण जोहरच्या भेटीवरुन चर्चा 

यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू तसेच संघाची माजी कर्णधार मिताली राजवरही बायोपिक येऊ घातला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू यात मितालीची भूमिका साकारताना दिसणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेटचे कर्णधार सौरव गांगुलीच्या आयुष्यावर लवकरच एक सिनेमा येऊ शकतो असे म्हटले जात आहे. निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीला भेटला होता. यावेळी दोघांमध्ये बायोपिकवरून चर्चा झाल्याचे म्हटले जात होते. हे सत साऱ्यांनाच माहीत आहे की सौरव गांगुलीला ‘दादा’ म्हणून हाक मारली जाते. त्यामुळे या सिनेमाचं नावही ‘दादागिरी’ असे ठेवले जाऊ शकते अशा चर्चा रंगत आहेत.

कोणता अभिनेता सारकारणार भूमिका?

म्हणूनच या सिनेमासाठी एका अभिनेत्याचा शोध सुरू आहे. या सगळ्यात कोणता अभिनेता सौरव गांगुलीची भूमिका बजावेल हे पाहणे उत्सुकतेचं असेल. जर सौरव यांच्या आयुष्यावर सिनेमा तयार करण्याचे निश्चित झाले तर चित्रपटगृहात प्रेक्षकांची रांगच लागेल यात काही शंका नाही. कारण सौरव गांगुलीचं करिअर, कर्णधारपद आणि त्याच्याशी निगडीत वाद नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता करण जोहर या सिनेमाची अधिकृत घोषणा कधी करतो याची सर्वजण वाट पाहत आहेत.