अभिषेक बच्चनमुळे ‘हा’ अभिनेता होळीला घाबरतो

अभिनेता करण जोहर होळी या सणाला खूप घाबरतो. त्यामागे नेमक काय कारण आहे हे करणने स्वत: सांगितलं आहे.

Mumbai
Karan Johar
करण जोहर

बॉलिवूडमध्ये प्रत्येक सण साजरा करायची जणू पध्दतच पडली आहे. दिवाळी असो वा गणपती किंवा होळी प्रत्येक सण संपूर्ण बॉलिवूड एकत्र येऊन साजरा करतो. रंगमंचमी हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. अनेक दिग्गज कलाकारांच्या घरी मोठ्या प्रमाणावर होळीचं आयोजन केलं जातं. शहेशहा अमिताभ बच्चन यांच्या घरी प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यांच्या घरी कलाकारांची रिघ लागते. या पार्टीमध्ये अनेक नवीन, दिग्गज कलाकार सामील होत असतात. मात्र बॉलिवूडचा एक कलाकार असा आहे जो होळी हा सण कधीच साजरा करत नाही. तो सुध्दा ज्युनिएर बच्चनमुळे.

बॉलिवूडचा तो कलाकार आहे, अभिनेता दिग्दर्शक करण जोहरा. आता करण होळी अभिषेक बच्चनमुळे का खेळत नाही याचा किस्सा स्वत: करणनेच सांगितला आहे. आपल्याला होळी विषयी भिती वाटते यावर करण म्हणाला, होळीपासून मी नेहमीच चार हात लांब असतो. रंगमंचमीला स्विमींग पुलमध्ये ढकल्यामुळे करणच्या मनात होळीची भिती बसली आहे.

करण म्हणाला, अमिताभ बच्चन यांच्या घरी गेल्या अनेक वर्षापासून होळीच्या पार्टीचं आयोजन करण्यात येतं. मी लहानपणापासून या पार्टीत सहभागी होतो. मात्र तस लहानपणापासून मला रंग खेळायला अजिबात आवडत नाही. पण मी १० वर्षाचा असताना होळी खेळण्यासाठी मी अमिताभ बच्चन यांच्या घरी गेलो होतो. यावेळी अभिषेकने मला थेट स्विमींग पूलमध्ये ढकललं. तेव्हापासून माझ्या मनात रंगपंचमीविषयी प्रचंड भिती बसली आहे. तेव्हापासून मी आजही रंग खेळत नाही असं करण म्हणाला. मात्र अभिषेकने मला स्विमींग पूलमध्ये ढकल्यामुळे मला होळीची भिती बसली पण माझ्या आणि अभिषेकच्या मैत्रीत जराही फरक पडला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here