तैमूरमुळे बेबो – सैफला ३ तासांचे मिळणार १.५ कोटी

बेबी केअर ब्रँडचा तैमूर अली खान ब्रँड अॅम्बेसिडर झाला.

Mumbai
kareena kapoor and saif ali khan being paid 1 5 crore because of taimur ali khan
तैमूरमुळे बेबो - सैफला ३ तासांचे मिळणार १.५ कोटी

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकतीच तैमूरच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार, बेबी केअर ब्रँडचा तैमूर अली खान हा ब्रँड अॅम्बेसिडर झाला आहे. ‘मिड डे’च्या वृत्तानुसार लोकप्रिय ब्रँड असलेला बेबी केअर डायपरच्या जाहिरातीकरिता ब्रँड अॅम्बेसिडर करण्यासाठी करीना आणि सैफ यांच्याबरोबर करार करण्यात आला आहे. त्यांना तीन तासांसाठी १.५ कोटी रुपये दिले जाणार आहे.

View this post on Instagram

#pictureoftheday? ❤️❤️❤️❤️?

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

‘मिड डे’च्या वृत्तानुसार, मागील एक वर्षापासून बेबी केअर ब्रँडचे प्रमुख करीना कपूर आणि सैफ अली खानसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्यामुळे त्यांचाशी बातचित करत होते. एकीकडे या ब्रँडचा करीना आणि सैफला ब्रँड अॅम्बेसिडर बनविण्याचे हेतू असला तरी दुसरा हेतू तैमूर अली खान होता. यापूर्वी करीना आणि सैफने या कराराला नाकारल होत. पण गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा ब्रँडच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. नुकताच त्यांनी हा करार मान्य केला आहे. त्यांना तीन तासांच्या शूटिंगसाठी १.५ कोटी रुपये दिले जाणार आहे.

लवकरच करीना कपूर ‘अंग्रेजी मीडियम’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सैफ अली खान ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – ऐश्वर्याच्या मुलाने केली तिच्यासोबत राहण्याची मागणी; पाहा ‘त्याचा’ फोटो