घरमनोरंजनVideo: दिलजीत दोसांझच्या 'या' गाण्याचे करिनाने केले कौतुक

Video: दिलजीत दोसांझच्या ‘या’ गाण्याचे करिनाने केले कौतुक

Subscribe

करिनाने हे गाणं पहिल्यांदा ऐकले तेव्हा स्वतः करिनाने दिलजीतचे खूप कौतुक केले

अभिनेत्री करिना कपूर खान तिसऱ्यांदा दिलजीत दोसांझसोबत ‘गुड न्यूज’ या चित्रपटात काम करत आहे. दिलजीत दोसांझने आपल्या आवाजासह अभिनयाची अनोखी झलक दाखवल्याने फक्त त्याचा चाहचा वर्ग त्याच्यावर फिदा झाला नाही तर, यामध्ये मोठ्या कलाकारांचा देखील समावेश आहे. या यादीमध्ये आता करिना कपूर खानचा समावेश झाला आहे. नुकताच दिलजीतने काईली-करिना या नावाने एक नवीन गाणं प्रदर्शित केले आहे. यामध्ये करिना कपूरचे नाव घेत दिलजीत गाणे गायले आहे. ज्यावेळी करिनाने हे गाणं पहिल्यांदा ऐकले तेव्हा स्वतः करिनाने दिलजीतचे खूप कौतुक केले.

- Advertisement -

सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर करत करिनाने दिलजीतला या गाण्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. यासोबतच करिनाने असे ही सांगितले की, ‘दिलजीत फार बोलका नाही. आम्ही दोघांनी सोबत दोन चित्रपट केले आहे. जरी तो कमी बोलत असला तरी, तो त्याच्या मनातील भावना गाण्यांद्वारे व्यक्त करतो आणि हीच एक गोष्ट मला त्याची आवडते.’


करिना पुढे म्हटली की, ‘तुम्ही गाण्यात म्हणाले की तुम्ही माझे चाहते आहात पण मला सांगायला आवडेल की मी तुमची खूप मोठी चाहती आहे, असे सांगत या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्यात.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -