घरमनोरंजनकरिनाने 'अंग्रेजी मिडीयम' साईन केल्यानंतर बघितला 'हा' चित्रपट

करिनाने ‘अंग्रेजी मिडीयम’ साईन केल्यानंतर बघितला ‘हा’ चित्रपट

Subscribe

तैमुरच्या जन्मानंतर करीना कपूरने पुन्हा एकदा आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे. २०१७ मध्ये एज्युकेशनवर आधारलेली अंग्रेझी मीडियम २ मध्ये इरफान खानच्या विरूद्ध भूमिकेत दिसणार आहे. यापुर्वी करिनाने केलेल्या१९ वर्षाच्या कारकिर्दीत जशी भूमिका केली नव्हती ती या चित्रपटामध्ये करताना दिसेल. पण या चित्रपटाविषयी करिनाने एक अनोखा खुलासा केला आहे.

- Advertisement -

करिना म्हणाली, मी जेव्हा अंग्रेझी मिडीयम हा चित्रपट साईन केला त्यानंतर मी हिंदी मिडीयम बघितला. या आधी मी हिंदी मिडीयम हा चित्रपट बघितलेला नव्हता. करिनाचे चाहते तीला अंग्रेझी मिडीयममध्ये इरफान खानबरोबर बघायला उत्सुक आहेत. करिना एका पोलिस ऑफिसरची भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यास करिना स्वतःच खूप उत्सुक आहे. करिना आपल्या भूमिकेसाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. २०१८ मध्ये आलेला वीर दि वेडिंगमध्ये स्त्रिवादी भूमिकेत दिसली होती.

- Advertisement -

हा चित्रपट स्विकारण्यामागचं कारणही करिनाने सांगितलं होतं. या चित्रपटात केवळ इरफान असल्यामुळे करिनाने होकार दिला आहे. या चित्रपटात तिची अगदी छोटी भूमिका आहे. पण केवळ इरफान या चित्रपटात असल्यामुळे करिनाने या चित्रपटात काम करायला होकार दिला आहे. करिनाला इरफान बरोबर काम करण्याची संधी सोडायची नव्हती त्यामुळे तीने छोटी भूमिका असतानाही हा चित्रपट स्विकारला. या चित्रपटाविषयी बोलताना करिना म्हणाली, मला माहित नव्हत की मला पुन्हा अशी संधी मिळेल. मी आणि इरफान खूप वेगळे आहोत. आम्ही केलेली कामं ही वेगवेगळ्या धाटणीची आहेत. पण ही भूमिका खूप चांगली आहे. भूमिका छोटी असली म्हणून काय झालं मला इरफान बरोबर काम करायला मिळतय हे माझ्यासाठी खूप आहे.

नुकताच इरफान आपल्या आजारावर इलाजकरून भारतात परत आला आहे. आपल्या आजारानंतर तो ‘अंग्रेजी मिडीयम’ या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसेल. होमी अदजानिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. इरफान,करिना बरोबरच राधिका मदान आणि दीपक डोबरियाल यांच्या भूमिका आहेत. ‘अंग्रेजी मिडीयम’ हा हिंदी मिडीयम चा सिक्वेल आहे. पुढीच्या वर्षी एप्रिल महिन्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -