करिना कपूरच्या दिलखेचक अदा, पाहा Video!

शोमध्ये रंगीबेरंगी गाऊन परिधान केलेल्या करिनाने आणि तिच्या डिझाईनर ड्रेसने कोणाचं लक्ष वेधून घेतलं नसतं तरच नवल.

Mumbai
kareena kapoor ramp look
करिना कपूर खानचा जलवा (फोटो सौ.- DNA)
सध्या ग्लॅमर आणि फॅशन वर्ल्डमध्ये ‘लॅक्मे फॅशन वीक’चा बोलबोला आहे. मात्र, त्याहीपेक्षा सध्या चर्चा आहे ती लॅक्मे फॅशन वीकमधील करिना कपूरच्या भन्नाट रॅम्प वॉकची. लॅक्मे फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना करिना कपूर खानने तिच्या दिलखेचक अदांनी आणि ग्लॅमरस लूक्सने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. लॅक्मे फॅशन वीक २०१८ च्या फायनल शोमध्ये करिनाने शो-स्टॉपर म्हणून सहभाग घेतला होता. यावेळेचा करिनाचा अप्रतिम ड्रेस डिझायनर मोनिशा जयसिंगने डिझाईन केला होता. करिना Lakmé या जगविख्यात ब्रँडशी गेल्या अनेक वर्षांपासून संलघ्न आहे. लॅक्मेच्या कॉस्मेटिक ब्रँड्सची करिना बऱ्याच काळापासून ब्रँड अँबेसिडर आहे. त्यामुळे या शोमध्ये तिचा सहभाग असणं ही गोष्ट अगदीच स्वाभाविक आहे. दरम्यान शोमध्ये रंगीबेरंगी गाऊन परिधान केलेल्या करिनाने आणि तिच्या डिझाईनर ड्रेसने कोणाचं लक्ष वेधून घेतलं नसतं तरच नवल. तुम्हीही पाहा, रॅम्पवरील करिनाच्या दिलखेचक अदांची एक झलक

@lakmefashionwk for @monishajaising collection ??

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

 व्हिडिओ सौजन्य- therealkareenakapoor इन्स्टाग्राम

ऑगस्ट महिन्याच्या २२ तारखेपासून सुरुवात झालेल्या या लॅक्मे फॅशन शोमध्ये, एकूण ९० डिझायनर्सनी सहभाग घेतला होता. या सर्व डिझाईनर्सनी त्यांची डिझाईनर कपड्यांची खास कलेक्शन्स या शोमध्ये सादर केली. यामध्ये प्रामुख्याने पायल सिंघल, राजेश प्रताप सिंग, ठाकूर आणि मोनिशा जयसिंग या डिझाईनर्सचा सहभाग होता. यावेळी अनेक मॉडेल्सनी तसंच बॉलीवूड सेलिब्रिटीजनी रॅम्पवर आपला जलवा दाखवला. करिना कपूर शिवाय बी-टाऊनच्या अन्य काही सेलिब्रिटीजनीही लॅक्मेच्या या फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये करण जोहर, श्वेता नंदा बच्चन, लारा दत्ता आदी सिलेब्जचा समावेश होता.

हेही वाचा : करिना कपूर आणि अर्जून कपूर पुन्हा एकत्र?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here