करीना कपूरने ठेवली वेबसीरीज करण्यासाठी ही अट

करीना कपूर वेबसीरीजमध्ये काम करण्यासाठी तयार झाली आहे. पंरतू यासाठी तिची एक अट आहे. ही अट तिने मांडली आहे.

Mumbai
kareena kapoor
अभिनेत्री करीना कपूर

बॉलीवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर आगामी काळात वेबसीरीजमध्ये दिसली तर आश्चर्य वाटू नये. करीना कपूर वेबसीरीजमध्ये काम करण्यासाठी तयार झाली आहे. पंरतू यासाठी तिची एक अट आहे. करीना सांगते की, वेबसीरीजमध्ये ते तेव्हाच काम करेल, जेव्हा ती सैफ अली खानच्या सेक्रेड गेम्ससारखी उत्तम वेबसीरीज असेल. सेक्रेड गेम्स ही एक अतुलनिय वेबसीरीज असून याने भारतीय कलाकृतीला जगाच्या पटलावर पोहोचवले आहे. अशा प्रकारची पटकथा, त्यातील कलाकार यामुळे सेक्रेड गेम्स् इतकी लोकप्रिय झाली, असे करीना कपूर यांनी म्हटले आहे.

वाचा : #MeToo मुळे सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लटकला

दुसऱ्या सीजनच्या चित्रीकरणाला सुरुवात

दरम्यान, वेबसीरिजमधील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असताना त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्यातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानचे चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नेटफ्लिक्सवरील तुफान गाजलेल्या या वेबसीरिजला प्रेक्षकांनी खुपच पंसत केले होते. यामधील कलाकार नवाजुद्दीन सिद्धीकी, राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि इतर यांच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.

वाचा : सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांनी सीजन २ साठी सुरू केली मोहीम

वाचा : ‘सेक्रेड गेम्स २’चं चित्रीकरण सुरु, सैफचा फोटो व्हायरल!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here