लवकरच तैमूर होणार दादा; ट्विटरवर नेटकऱ्यांच्या मिम्सचा धुमाकूळ

अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीना आणि सैफ अली खाननं स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तर नेटकरी मिम्स आणि जोक्स तयार करत चांगलेच व्हायरल करताना दिसत आहे.

kareena saif are expecting their second baby and twitter cant keep calm see memes
लवकरच तैमूर होणार दादा; ट्विटरवर नेटकऱ्यांच्या मिम्सचा धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांनी पुन्हा एकदा गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीना आणि सैफ अली खाननं स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबात तैमूरला लवकरच भाऊ किंवा बहीण मिळणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर करीना आई होणार याची चांगलीच चर्चा होताना दिसत असून नेटकरी मिम्स आणि जोक्स तयार करत चांगलेच व्हायरल करत आहेत.

करीनाच्या Good News नंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर दिल्या अशा प्रतिक्रिया