घरमनोरंजन'कारगिल विजय दिना'निमित्ताने 'उरी' चित्रपट पहा मोफत

‘कारगिल विजय दिना’निमित्ताने ‘उरी’ चित्रपट पहा मोफत

Subscribe

'कारगिल विजय दिना'च्या पार्श्वभीूमीवर २६ जुलैला राज्यभरात सिनेमागृहांमध्ये 'उरी' चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण केले जाणार आहे.

आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सैनिकांचे फार मोठे योगदान आहे. आपल्याला सुखाचे आयुष्य जगता यावे म्हणून सैनिक देशाच्या सीमारेषेवर ऊन, वारा, थंडी आणि पाऊसाला सामोरे जातात. ते आपल्यासाठी शुन्य डीग्री सेल्सिअस पेक्षाही कमी असणाऱ्या तापमानात देशाच्या संरक्षणासाठी उभे राहतात. त्यांच्या याच शौऱ्याची जाणीव नागरिकांना व्हावी आणि तरुणांना सैनिकांकडून प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून राज्यभरात २६ जुलैला ‘कारगिल विजय दिना’निमित्ताने उरी चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण केले जाणार आहे. कारगिल युद्ध १९९९ मध्ये झाले होते. यामध्ये भारतीय शूरविरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या सैन्याने काबीज केलेले प्रदेश भारतीय सैन्याने लढाई करुन पुन्हा मिळवले होते. भारतीय सैन्याच्या माऱ्यापुढे पाकिस्तानी सैनिकांची पळता भुई थोडी झाली होती. साधारणत: दोन महिने हे युद्ध चालले होते. अखेर भारताने विजय मिळवत देशाचा तिरंगा फळकवला होता. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करुनही शौर्य दाखवले आहे. या शौैऱ्यावरच आधारीत ‘उरी’ चित्रपट ‘कारगिल विजय दिना’च्या दिवशी मोफत पाहता येणार आहे.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले पत्र

दरम्यान मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ‘आपलं महानगर’शी खासगित बोलताना सांगितले की, ‘कारगिल विजय दिवसाला ‘उरी’ सिनेमा राज्यभर दाखवता यावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले असून, राज्यातील सर्व सिनेमागृहात ‘उरी’चा सकाळी शो दाखवण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील ४५० सिनेमागृहांमध्ये ‘उरी’ सिनेमाचा  मोफत शो पाहता येणार आहे.’ यासाठी निर्माता, दिग्दर्शक,वितरक आणि सिनेमागृहांचे मालक यांच्याशी बोलणे झाले असून, ते देखील यासाठी तयार झाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

- Advertisement -

म्हणून ‘उरी’चा मोफत शो

‘उरी’ या सिनेमामध्ये सैनिकांचे शौर्य दाखवले गेले आहे. ‘कारगिल विजय दिना’च्या दिवशी हा सिनेमा दाखवून आपले सैनिक आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:चा जीव कशाप्रकारे धोक्यात घालत असतात, याची जाणीव सर्वांना व्हावी तसेच जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे.

माजी सैनिक आणि सिनेअभिनेत्यांमध्ये रंगणार फुटबॉ लचा सामना

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ‘कारगिल विजय दिना’च्या निमित्ताने सिने अभिनेते आणि माजी सैनिकांमध्ये फुटबॉलचा सामना आयोजित करण्यात आला असून, यासाठी तिन्ही दलाच्या माजी सैनिकांनी परवानगी दिली आहे. सिनेअभिनेत्यांच्या संमतीची वाट पाहत असून, हा सामना मुंबईत रंगणार असल्याची माहिती संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. विशेष बाब म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.

१८ ते २५ वयोगटातील तरुणांनी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पहावा ज्यामुळे तरुणांमध्ये सैनिकांबद्दल आदर अधिक वाढेल आणि युवकांना सैन्यामध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळेल. 
– संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास आणि माजी सैनिक कल्याण मंत्री
- Advertisement -

हेही वाचा – ऑपरेशन विजय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -