कार्तिक-साराचा शिमलातील अनोखा अंदाज होतोय व्हायरल

या व्हायरल होणाऱ्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Mumbai

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान या दोघांनी दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी ‘लव आज कल २’ चित्रपटाची शुटिंग नुकतीच सुरू केली आहे. या दोघांना आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ मिळाल्यावर ते दोघेही फिरायला जातात. या दोघांचे हिमाचल प्रदेशातील शिमला येथील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सारा अली खानसोबत कार्तिक आर्यन या दोघांनीही हिमाचलची टोपी डोक्यावर घातलेली दिसत आहे.

या लूकमध्ये दोघेही सुंदर दिसत असल्याने त्यांच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. शिमलामधील या वातावरणात दोघेही खूप धम्माल करताना दिसत आहे. कार्तिक आणि साराच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सारा आणि कार्तिक शिमलाच्या पारंपारिक वेशात दिसत असून हा व्हायरल होणारा फोटो सारा-कार्तिकच्या फॅन क्लबने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.